Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी
यंदाच्या वर्षी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळेल किंवा पुन्हा एकदा ती जादुई ट्रॉफी मुंबई इंडियन्स उंचावताना दिसेल. मंगळवारी मुंबई विरुद्ध दिल्ली अशी अंतिम सामन्याची रोमहर्षक लढत पार पडणार आहे. या लढतीत दिल्लीविरुद्ध मुंबईचं पारडं जड मानलं जातंय.
Follow us on
यंदाच्या वर्षी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळेल किंवा पुन्हा एकदा ती जादुई ट्रॉफी मुंबई इंडियन्स उंचावताना दिसेल. मंगळवारी मुंबई विरुद्ध दिल्ली अशी अंतिम सामन्याची रोमहर्षक लढत पार पडणार आहे. या लढतीत दिल्लीविरुद्ध मुंबईचं पारडं जड मानलं जातंय.
मुंबईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं आहे. यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांचा मोठा हात राहिलेला आहे. यावेळीही मुंबईचे बुमराह आणि बोल्ट मुंबईच्या विजयाची कहाणी लिहित आहेत. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी या हंगामात 49 फलंदाजांची शिकार केली आहे. बुमराह आणि बोल्टच्या विकेट्स या स्पर्धेत एखाद्या टीमच्या पेसर जोडीने मिळवलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत.
मुंबईच्या सलामीच्या जोडीची बॅटिंग ही त्यांचं बलस्थान आहे. क्विंटन डिकॉक, इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड अशा एकाहून एक तगड्या बॅट्समनचा मुंबईत भरणा आहे. तसं पाहिलं तर रोहितची बॅट या मोसमात जास्त बोलली नाहीये मात्र स्पर्धेच्या शेवटच्या मॅचमध्ये तुफानी खेळी करुन शेवट गोड करण्याचा रोहित प्रयत्न करेल.
मुंबईची मधल्या फळीतील बॅटिंग त्यांचं सर्वांत मोठं शक्तीस्थान आहे. ज्यावेळी रन्सचा पाठलाग करण्याचा प्रसंग येतो त्यावेळीही आक्रमक बॅटिंगचा नजारा सादर करुन आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम मुंबईचे मधल्या पळीतील बॅट्समन सातत्याने करत आले आहेत.
मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून देण्यात भारतीय खेळाडूंनी मोठी भूमिका बजावली आहे आणि यावेळीही मुंबईच्या संघातील भारतीय खेळाडूंनी दमदार परफॉर्मन्स दिला आहे. संघात कर्णधार रोहित शर्माशिवाय जसप्रीत बुमराह, पांड्या ब्रदर्स, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन असे मोठे स्टार खेळाडू आहे जे मॅचविनिंग खेळी करण्यात माहिर आहेत.