MI vs DC IPL 2023 Highlight : मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील पहिला विजय, दिल्लीची पराभवाची मालिका सुरुच

| Updated on: Apr 11, 2023 | 11:41 PM

MI vs DC IPL 2023 Highlight : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं पहिल्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली विरुद्धचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. त्यामुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढली होती.

MI vs DC IPL 2023 Highlight : मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील पहिला विजय, दिल्लीची पराभवाची मालिका सुरुच

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं पहिला विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई बाजी मारली. तर दिल्लीनं आपल्या पराभवाची मालिका सुरुच ठेवली आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाला नवसंजीवनी मिळाली आहे. तर दिल्लीची गुणतालिकेत घसरण शेवटच्या स्थानावर झाली आहे. मुंबईला स्पर्धेत अजून 11 सामने खेळायचे आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 11 Apr 2023 11:25 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | शेवटच्या चेंडूवर चित्त थरारक विजय, मुंबईने मारली बाजी

    मुंबईला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती. नोर्तजेच्या गोलंदाजीवर टिम डेविडने चेंडू तटावला आणि दोन धावा काढल्या. अखरेच्या चेंडूवर रन आउट की नाही यामुळे धाकधूक वाढली होती. मात्र टिम डेविडने धाव पूर्ण केल्याने विजयी घोषित करण्यात आलं.

  • 11 Apr 2023 11:04 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | रोहित शर्मा बाद झाल्याने संघावरचा दबाव वाढला

  • 11 Apr 2023 10:53 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | सूर्यकुमार यादव पुन्हा फेल

  • 11 Apr 2023 10:50 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, तिलक वर्मा 41 धावा करून बाद

  • 11 Apr 2023 10:27 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | रोहित शर्माने झळकावलं 31 चेंडूत अर्धशतक

  • 11 Apr 2023 10:05 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | इशान किशन 31 धावा करून तंबूत

  • 11 Apr 2023 09:52 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | रोहित शर्मा आणि इशान किशनची अर्धशतकी भागीदारी

  • 11 Apr 2023 09:21 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव

    दिल्लीचा डाव

    दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पृथ्वी शॉ त्याच्या गोलंदाजीवर 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे जोडी मैदानात चांगली जमली. ऋतिकने आठव्या षटकातील एक चेंडू नो टाकला त्यावर फ्री हीट मिळाला. त्यावर स्ट्राईकला डावखुरा डेविड वॉर्नर होता. मात्र त्याने डावखुरा पद्धतीने फलंदाजी करण्याऐवजी उजव्या हाताने गोलंदाजीला सामोरा गेला. यामुळे मैदानात उपस्थित खेळाडूंसह समालोचकांना सुद्धा प्रश्न पडला नेमकं डेविड वॉर्नरला झालं तरी काय? पण फ्री हीट असलेला चेंडू वाया गेला. म्हणजेच त्या चेंडूवर षटकार किंवा चौकाराऐवजी एक धावेवर समाधान मानावं लागलं.

    पियुष चावला याच्या गोलंदाजीवर मनिष पांडे बाद झाला. त्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर यश धुल आला आणि हजेरी लावून गेला. रिले मेरेडिथच्या गोलंदाचीवर नेहन वधेराने त्याचा झेल घेतला. रोवमॅन पॉवेल काही खास करू शकला नाही. 4 धावांवर पियुष चावलानं त्याला पायचीत केलं. त्यानंतर आलेला ललित यादवही काही खास करू शकला नाही. 2 या धावसंख्येवर त्रिफळाचीत झाला.

    डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल जोडीने चांगली फटकेबाजी केली. एका बाजूला 43 चेंडूत डेविड वॉर्नरने आपलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अक्षर पटेलनं जलद अर्धशतक झळकावलं. त्याने 25 चेंडूत 54 धावा केल्या. अक्षर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नर 47 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवला यादवला भोपळाही फोडता आला नाही. धावचीत होत तंबूत परतला.

    त्यानंतर अभिषेक पेरोल 1 धाव करून झेल बाद झाला. एनरिच नॉर्तजे 5 धावांवर त्रिफळाचीत झाला. एकाच षटकात 4 गडी बाद झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारत्या आली नाही.

  • 11 Apr 2023 09:17 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीचं मुंबईसमोर 173 धावांचं आव्हान

    दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूवर बाद झाला. दिल्लीने सर्वबाद 172 धावा केल्या. आता मुंबईचा संघ हे आव्हान गाठतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांने अजून एकही सामना या स्पर्धेत जिंकलेला नाही.

  • 11 Apr 2023 09:10 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीची गाडी घसरली, एका षटकात चार गडी बाद

  • 11 Apr 2023 09:06 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | अक्षर पटेल आणि डेविड वॉर्नर अर्धशतकी खेळी करून बाद

  • 11 Apr 2023 09:02 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | अक्षर पटेलचं अर्धशतक

  • 11 Apr 2023 08:49 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | डेविड वॉर्नरचं अर्धशतक

    डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल जोडीने चांगली फटकेबाजी केली. एका बाजूला 43 चेंडूत डेविड वॉर्नरने आपलं अर्धशतक झळकावलं.

  • 11 Apr 2023 08:35 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | ललित यादव अवघ्या दोन धावा करून बाद

  • 11 Apr 2023 08:25 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | डेविड वॉर्नरची एकाकी झुंज, धुलनंतर पॉवेलही स्वस्तात बाद

  • 11 Apr 2023 08:21 PM (IST)

    नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी

    दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस

    शहरातील पंचवटी, शालिमार, सिडको भागात पावसाची हजेरी

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील अवकाळी पाऊस

  • 11 Apr 2023 08:18 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्लीला यश धुलच्या रुपाने तिसरा धक्का

  • 11 Apr 2023 08:12 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | मनिष पांडे 18 चेंडूत 26 धावा करून बाद

  • 11 Apr 2023 07:46 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | पृथ्वी शॉ पुन्हा फेल, 10 चेंडूत 15 धावा करून बाद

  • 11 Apr 2023 07:15 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सचे इम्पॅक्ट प्लेयर

    अमन खान, मुकेश कुमार, सरफराज खान, प्रवीण दुबे, इशांत शर्मा
  • 11 Apr 2023 07:14 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सचे इम्पॅक्ट प्लेयर

    ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग

  • 11 Apr 2023 07:09 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

  • 11 Apr 2023 07:08 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

  • 11 Apr 2023 07:07 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | नाणेफेकीच्या कौलनंतर रोहित शर्मा म्हणाला की…

    आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्ही पहिल्या दोन सामन्यात फलंदाजी केली. त्यात चांगली कामगिरी केली नाही. खेळपट्टी कोरडी आहे आणि कदाचित थोडे वळण असं दिसतंय. आम्हाला स्टब्सच्या जागी रिले मेरीडिथ संधी देण्याचा निर्णय घेतलाय. जोफ्रा या सामन्यात नाही.

  • 11 Apr 2023 07:02 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | नाणेफेकीचा कौल मुंबईने जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    मुंबईने दोन सामन्यातून धडा घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 11 Apr 2023 06:56 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | सामन्यापूर्वी डेविड वॉर्नर आणि सूर्यकुमार यादवची ग्रेट भेट

  • 11 Apr 2023 05:52 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

  • 11 Apr 2023 05:52 PM (IST)

    MI vs DC IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

    मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

Published On - Apr 11,2023 5:51 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.