MI vs RCB, IPL 2021 Match 1 Result | एबीडी व्हीलियर्सची शानदार खेळी, थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

| Updated on: Apr 15, 2021 | 3:55 PM

MI vs RCB 2021 Live Score Marathi | मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लाईव्ह अपडेट्स

MI vs RCB, IPL 2021 Match 1 Result | एबीडी व्हीलियर्सची शानदार खेळी, थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी

चेन्नई :  विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. (mi vs rcb live score ipl 2021 match mumbai indians vs royal challengers bangalore scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

शेवटच्या चेंडूवर विजयी धाव

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने सामना आरसीबीच्या हातून निसटेल असं वाटत होतं. परंतु गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षल पटेलने शेवटची धाव घेत सामना जिंकण्यात मोलाची भूमिका निभावली.

मुंबईचा ‘पंच’नामा करणारा हर्षल पटेल सामनावीर

दुसऱ्या बाजूला प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या पलटणचा बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने ‘पंच’नामा केला. हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे 5 पैकी 3 विकेट्स त्याने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. हर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कारना सन्मानित करण्यात आले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 09 Apr 2021 11:16 PM (IST)

    बंगळुरुला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता

    बंगळुरुला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता आहे. मैदानात एबी डी व्हीलियर्स आणि हर्षल पटेल खेळत आहेत.

  • 09 Apr 2021 11:09 PM (IST)

    बंगळुरुला विजयासाठी 12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता

    बंगळुरुला विजयासाठी शेवटच्या  12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. मैदानात एबीडी व्हीलियर्स आणि कायले जेमिन्सन खेळत आहेत.

  • 09 Apr 2021 11:02 PM (IST)

    मुंबईला सहावं यश, बुमराहच्या गोलंदाजीवर डॅन ख्रिश्चन बाद

    मुंबई इंडियन्सला सहावं यश प्राप्त झालं आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने डॅन ख्रिश्चनला राहुल चाहरकरवी झेलबाद करत मुंबईचं या सामन्यातील आव्हान जिंवत ठेवलं आहे. (बँगलोर 122/6)

  • 09 Apr 2021 10:51 PM (IST)

    मुंबईला पाचवं यश, मॅक्सवेलपाठोपाठ शाहबाज अहमद बाद

    Marco Jansen ने मुंबई इंडियन्सचं या सामन्यातील आवाहन जिवंत ठेवलं आहे. त्याने वैयक्तिक तिसऱ्या षटकात आधी मॅक्सवेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला तर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने शाहबाज अहमदला कृणाल पंड्याकडे झेल द्यायला भाग पाडलं. मुंबईच्या खात्यात पाचवी विकेट जमा झाली आहे. अहमद एक धाव करुन बाद झाला. (बँगलोर 106/5)

  • 09 Apr 2021 10:46 PM (IST)

    चौथ्या विकेटसह मुंबईचं कमबॅक, घातक ग्लेन मॅक्सवेल पव्हेलियनमध्ये!

    Marco Jansen ने मुंबई इंडियन्सचं सामन्यात कमबॅक केलं आहे. Jansen ने घातक ठरू पाहणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. ख्रिस लिनने मॅक्सवेलचा अफलातून झेल टिपत मॅक्सवेलला बाद केलं आहे. त्याने 28 चेंडूत 39 धावा केल्या. (बँगलोर 103/4)

  • 09 Apr 2021 10:39 PM (IST)

    मुंबईला तिसरं यश, बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद

    जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली पायचित (LBW) झाला आहे. कोहलीने 29 चेंडूत 33 धावा केल्या. (बँगलोर 98/3)

  • 09 Apr 2021 10:32 PM (IST)

    मॅक्सवेलचे दोन गगनचुंबी षटकार

    आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलच्या गेल्या हंगामात एकही षटकार लगावता आला नव्हता. परंतु आजच्या सामन्याद्वारे त्याने चांगलंच पुनरागमन केलं आहे. 11 व्या आणि 12 व्या षटकात त्याने दोन गगनचुंबी षटकार ठोकत मुंबईच्या गोलंदाजांना बॅकफुटवर ढकललं आहे. (बँगलोर 95/2)

  • 09 Apr 2021 10:28 PM (IST)

    कोहली-मॅक्सवेलची विजयाच्या दिशेने कूच

    46 धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली (30) आणि ग्लेन मॅक्सवेलने (26) आरसीबीचा डाव सावरला आहे. (बँगलोर 90/2)

  • 09 Apr 2021 10:25 PM (IST)

    कृणालच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलचा खणखणीत चौकार

    9 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार फटकावला. (बँगलौर 69/2)

  • 09 Apr 2021 10:19 PM (IST)

    फलंदाजीसाठी डिव्हिलियर्सआधी मॅक्सवेल

    आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला एबी डिव्हिलियर्सच्या आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आहे. संघाला मॅक्सवेलकडून मोठ्या आशा आहेत कारण त्यांनी मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी खूप खर्च केला आहे. मॅक्सवेल कोहली-डिव्हिलियर्सवरील दबाव दूर करू शकतो. (RCB- 50/2)

  • 09 Apr 2021 10:05 PM (IST)

    बंगळुरुला दुसरा झटका

    ट्रेन्ट बोल्टने बंगळुरुला दुसरा झटका दिला आहे. बोल्टने रजत पाटीदारला क्लिन बोल्ड केलं आहे. रजतने 8 धावा केल्या.

  • 09 Apr 2021 10:00 PM (IST)

    बंगळुरुला पहिला धक्का

    कृणाल पंड्याने बंगळुरुला पहिला झटका दिला आहे. पंड्याने सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरला 10 धावांवर ख्रिस लिनच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 09 Apr 2021 09:49 PM (IST)

    सुंदरला दुसऱ्याच चेंडूवर जीवनदान

    सुंदरला दुसऱ्याच चेंडूवर जीवदान मिळाले. पहिली ओव्हर ट्रेन्ट बोल्ट टाकत होता. या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर सुंदरने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागून सेंकड स्लीपवर असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने गेला. पण हा कॅच रोहितने सोडला. अशा प्रकारे सुंदरला जीवनदान मिळाले.

  • 09 Apr 2021 09:45 PM (IST)

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. बंगळुरुला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता आहे.

  • 09 Apr 2021 09:27 PM (IST)

    बंगळुरुला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता

    मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. मुंबईकडून ख्रिसन लिनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

  • 09 Apr 2021 09:17 PM (IST)

    मुंबईला बॅक टु बॅक दोन धक्के

    हर्षल पटेलने मुंबईला बॅक टु बॅक 2 धक्के दिले आहेत. हर्षलने कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डला आऊट केलं आहे.

  • 09 Apr 2021 09:05 PM (IST)

    मुंबईला पाचवा धक्का

    मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. हर्षल पटेलने इशान किशनला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. इशान किशनने 28 धावा केल्या.

  • 09 Apr 2021 08:52 PM (IST)

    मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पंड्या आऊट

    मुंबईला चौथी विकेट गमावली आहे. हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. पंड्याने हर्षल पटेलने हार्दिकला 13 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 09 Apr 2021 08:38 PM (IST)

    मुंबईला तिसरा धक्का

    मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. शानदार बॅटिंग करत असलेला ख्रिस लिन आऊट झाला आहे. ख्रिस लिन दुर्देवी ठरला. लिन 49 धावांवर कॅच आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरने स्वत:च्या गोलंदाजीवर लिनचा कॅच घेतला.

  • 09 Apr 2021 08:28 PM (IST)

    मुंबईला दुसरा धक्का

    मुंबईला दुसरा धक्का बसला आहे. कायले जेमीन्सलने सूर्यकुमार यादवला आऊट केलं आहे. सूर्याची विकेट जेमिन्सनच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट ठरली.  सूर्याने 23 चेंडूत 31 धावा केल्या.

  • 09 Apr 2021 08:15 PM (IST)

    ख्रिस लीन-सूर्यकुमार यादवची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    ख्रिस लिन आणि सूर्यकुमार यादवने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीदरम्यान दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. 
     
     
  • 09 Apr 2021 08:05 PM (IST)

    मुंबईच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 41 धावा

    मुंबई इंडियन्सने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 41 धावा केल्या आहेत. मुंबईने कर्णधार रोहित शर्माची एकमेव विकेट गमावली. सूर्यकुमार यादव आणि ख्रिस लीन मैदानात खेळत आहेत.

  • 09 Apr 2021 07:55 PM (IST)

    सूर्यकुमारची चौकाराने सुरुवात

    रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्याने चौकाराने  14 व्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे.

  • 09 Apr 2021 07:53 PM (IST)

    मुंबईला पहिला धक्का

    मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मा रन आऊट झाला आहे. स्ट्राईकवर असलेल्या ख्रिस लिनच्या चुकीच्या कॉलमुळे रोहित शर्मा रन आऊट झाला. रोहितने 19 धावा केल्या.

  • 09 Apr 2021 07:48 PM (IST)

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला षटकार रोहितच्या बॅटने

    हिटमॅन रोहित शर्माने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला षटकार लगावला आहे.  रोहितने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर युजवेंद्र चहलच्या बोलिंगवर सिक्स लगावला.

  • 09 Apr 2021 07:32 PM (IST)

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि ख्रिस लीन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 09 Apr 2021 07:22 PM (IST)

    अशी आहे विराटसेना

    विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हीलियर्स, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, डॅन ख्रिस्टियन, हर्षल पटेल, कायले जॅमीन्सन आणि शाहबाज अहमद.

  • 09 Apr 2021 07:20 PM (IST)

    मुंबई इंडियन्सची पलटण

    रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ख्रिस लिन, हार्दिक पंड्या, जयंत यादव, कृणाल पंड्या, ट्रेंट बोल्ट, मार्को यानसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

  • 09 Apr 2021 07:16 PM (IST)

    RCB कडून 3 खेळाडूंचं पदार्पण

    बंगळुरुकडून 3 खेळाडू पदार्पण करत आहेत. यामध्ये अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि कायले जॅमीन्सन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू बंगळुरुकडून पहिल्यांदाच खेळत आहेत. तसेच रजत पाटीदार आणि डॅनियल ख्रिश्चियनचा समावेश आहे. पाटीदारचा हा पदार्पणातील सामना आहे. तर डॅनियलने 8 वर्षानंतर बंगळुरुमध्ये कमबॅक केलं आहे.

  • 09 Apr 2021 07:12 PM (IST)

    मुंबईकडून 2 नव्या चेहऱ्यांना संधी

    मुंबई इंडियन्सने 2 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये क्विंटन डी कॉकच्या जागी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस लीन याला संधी दिली आहे. त्यामुळे लीनची मुंबई इंडियन्सकडून खेळताना ही पहिलीच मॅच असणार आहे. तसेच आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसनलाही संधी मिळाली आहे.

  • 09 Apr 2021 07:06 PM (IST)

    बंगळुरुने टॉस जिंकला

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.

  • 09 Apr 2021 06:36 PM (IST)

    टॉसचा बॉस कोण?

    या मोसमातील पहिल्या सामन्यात टॉस कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. 7 वाजता टॉस उडवण्यात येणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 09 Apr 2021 06:34 PM (IST)

    मुंबई विरुद्ध बंगळुरु आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 10,2021 12:38 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.