MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय

| Updated on: Apr 18, 2021 | 12:16 AM

MI vs RCB 2021 Live Score Marathi | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

MI vs SRH, IPL 2021 Match 9 Result | हैदराबादचा सलग तिसरा पराभव, मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय
MI vs RCB 2021 Live Score Marathi | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमधील आज नववा सामना आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली. सोबत कर्धणार डेव्हिड वॉर्नरने 36 धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुसरीकडे हैदराबादवर मात करत मुंबईने गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. आजच्या सामन्यात मुबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत 150 धावांचा बचाव केला. मुंबईकडून राहुल चाहरने 4 षटकात 19 धावा देत 3 तर ट्रेंट बोल्टने 3.4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्याने हैदराबादच्या दोन फलंदाजांना धावबाद केलं. (mi vs srh live score ipl 2021 match mumbai indians vs sunrisers hyderabad scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)

MI vs SRH लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Apr 2021 11:18 PM (IST)

    हैदराबादचा 10 वा फलंदाज बाद, मुंबईचा सलग दुसरा विजय

    ट्रेंट बोल्टने खलील अहमदला त्रिफळाचित करत हैदराबादचा संपूर्ण संघ बाद केला आहे.

  • 17 Apr 2021 11:08 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता

    हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे. हैदराबादने 8 विकेट्स गमावल्या आहेत.

  • 17 Apr 2021 11:04 PM (IST)

    हैदराबादला सातवा धक्का, राशिद खान आऊट

    हैदराबादने सातवी विकेट गमावली आहे. ट्रेन्ट बोल्टने राशिद खानला एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

  • 17 Apr 2021 11:00 PM (IST)

    हैदराबादला सहावा धक्का

    हैदराबादला सहावा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्याने अब्दुल समदला रन आऊट केलं आहे.

  • 17 Apr 2021 10:47 PM (IST)

    विजय शंकरचे सलग 2 सिक्स

    विजय शंकरने कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर 16 व्या ओव्हरमध्ये सलग 2 सिक्स लगावले.

  • 17 Apr 2021 10:44 PM (IST)

    राहुल चहरचा दणका, हैदराबादला 15 व्या ओव्हरमध्ये 2 झटके

    राहुल चहरने हैदराबादला 15 व्या ओव्हरमध्ये दुहेरी झटका दिला आहे. राहुलने हैदराबादच्या विराट सिंह आणि अभिषेक शर्माला आऊट केलं.

  • 17 Apr 2021 10:38 PM (IST)

    हैदराबादला चौथा धक्का

    हैदराबादचा चौथा गडी बाद झाला आहे. विराट सिंह 11 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 17 Apr 2021 10:26 PM (IST)

    हैदराबादला तिसरा धक्का

    हैदराबादला तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर रन आऊट झाला आहे. वॉर्नरने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण पॉइंटवर असलेल्या हार्दिक पंड्याच्या डायरेक्ट थ्रोमुळे वॉर्नर नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला.

  • 17 Apr 2021 10:18 PM (IST)

    हैदराबादला दुसरा धक्का

    हैदराबादने दुसरी विकेट गमावली आहे.  मनिष पांडेच्या रुपात हैदराबादला दुसरा झटका बसला आहे. मनिष पांडेने 2 धावा केल्या.

  • 17 Apr 2021 10:06 PM (IST)

    हैदराबादला पहिला धक्का

    हैदराबादला पहिला झटका बसला आहे. जॉनी बेयरस्टो स्वत:च्या चुकीने हिट विकेट आऊट झाला आहेे. बेयरस्टोने 43 धावांची खेळी केली.

  • 17 Apr 2021 09:58 PM (IST)

    हैदराबादच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 57 धावा

    हैदराबादने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 57 धावा केल्या आहेत. जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी खेळत आहे.

  • 17 Apr 2021 09:49 PM (IST)

    हैदराबादच्या सलामी जोडीची सलामी अर्धशतकी भागीदारी

    विजयी धावांचं पाठलाग करताना हैदराबादची शानदार सुरुवात झाली आहे. जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. बेयरस्टो चांगलीच फटकेबाजी करत आहे.

  • 17 Apr 2021 09:36 PM (IST)

    बेयरस्टोचा सिक्स

    जॉनी बेयरस्टोने तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला. त्याआधीच्या पहिल्या 2 चेंडूत सलग 2 चौकार लगावले.

  • 17 Apr 2021 09:35 PM (IST)

    जॉनी बेयरस्टोचे सलग 2 चौकार

    जॉनी बेयरस्टोने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.

  • 17 Apr 2021 09:24 PM (IST)

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. हैदराबादला  विजयासाठी 151 धावांची आवश्यकता आहे.

  • 17 Apr 2021 09:12 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 151 धावांचे आव्हान

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 151 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांची खेळी केली. तसेच कायरन पोलार्डने नाबाद 35 रन्स केल्या. हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

  • 17 Apr 2021 09:11 PM (IST)

    पोलार्डचे शेवटच्या 2 चेंडूत 2 सिक्स

    पोलार्डने सामन्यातील 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूत 2 सिक्स लगावले. त्यामुळे मुंबईला 150 धावांचा टप्पा गाठता आला. पोलार्डने नाबाद 35 धावांची खेळी केली.

  • 17 Apr 2021 09:02 PM (IST)

    विजय शंकरकडून पोलार्डला जीवनदान

    विजय शंकरने कायरन पोलार्डला जीवनदान दिले आहे. सामन्यातील 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पोलार्डला जीवनदान मिळाले. पोलार्ड तेव्हा 18 धावांवर खेळत होता.

  • 17 Apr 2021 08:52 PM (IST)

    मुंबईला चौथा धक्का, इशान किशन आऊट

    मुंबईने चौथा विकेट गमावली आहे. इशान किशन आऊट झाला आहे. इशानने 12 धावा केल्या.

  • 17 Apr 2021 08:35 PM (IST)

    मुंबईला तिसरा धक्का

    मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. क्विटंन डी कॉक आऊट झाला आहे. डी कॉकने 40 धावांची खेळी केली.

  • 17 Apr 2021 08:26 PM (IST)

    मुंबईच्या 12 ओव्हरनंतर 89 धावा

    मुंबईने 12 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 89 धावा केल्या आहेत. मैदानात क्विंटन डी कॉक आणि इशान किशन खेळत आहेत.

  • 17 Apr 2021 08:14 PM (IST)

    मुंबईला दुसरा धक्का

    मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 10 धावा केल्या.

  • 17 Apr 2021 08:11 PM (IST)

    सूर्यकुमार यादवचा सिक्स

    सूर्यकुमार यादवने सामन्यातील 8 ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विजय शंकरच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला.

  • 17 Apr 2021 08:05 PM (IST)

    मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट

    चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईला पहिला धक्का बसला आहे. फटकेबाजी करत असलेला रोहित शर्मा कॅच आऊट झाला आहे. रोहितने 32 धावांची खेळी केली.

  • 17 Apr 2021 08:01 PM (IST)

    मुंबईची शानदार सुरुवात

    मुंबईच्या  क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. मुंबईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 53 धावा केल्या.

  • 17 Apr 2021 07:50 PM (IST)

    रोहितचा सिक्स

    रोहित शर्माने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सामन्यातील चौथ्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर सिक्स खेचला आहे. रोहित चांगल्या फॉर्मात दिसत आहे.

  • 17 Apr 2021 07:45 PM (IST)

    हिटमॅन रोहितचा शानदार सिक्स

    रोहित शर्माने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूर मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला.

  • 17 Apr 2021 07:33 PM (IST)

    क्विंटन डी कॉक आणि मुंबईची चौकाराने सुरुवात

    क्विंटन डी कॉक आणि मुंबईची चौकाराने सुरुवात सुरुवात झाली आहे. क्विंटनने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला.

  • 17 Apr 2021 07:32 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 17 Apr 2021 07:22 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादचे शिलेदार

    डेव्हीड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, विराट सिंह, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब-उर-रहमान

  • 17 Apr 2021 07:20 PM (IST)

    मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 खेळाडू

    रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरान पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, ऐडम मिल्न, ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

  • 17 Apr 2021 07:19 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. मुंबईत 1 बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मार्को यानसनच्या जागी एडम मिल्नला संधी दिली आहे. तर हैदराबादने एकूण 4 बदल केले आहेत. संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह, खलील अहमद आणि मुजीब उर रहमानला संधी देण्यात आली आहे. विराट सिंहचं यानिमित्ताने पदार्पण ठरलं आहे. तर मुजीबचा हैदराबादसाठीचा पहिलाच सामना आहे.

  • 17 Apr 2021 07:13 PM (IST)

    मुंबईकडून आणखी एका खेळाडूला पदार्पणाची संधी

    कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. न्यूझीलंडचा वेगवागन गोलंदाज एडम मिल्नला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं हे डेब्यू ठरला आहे. रोहितने एडमला मुंबईची कॅप देत त्याचं स्वागत केलं.

  • 17 Apr 2021 07:04 PM (IST)

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 17 Apr 2021 06:37 PM (IST)

    मुंबई विरुद्ध हैदराबाद आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत रंगणार आहे.

Published On - Apr 17,2021 11:24 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.