Cwg 2022: Mirabai Chanu ने जिंकले सुवर्णपदक; जाणून घ्या आतापर्यंतचा तिचा प्रवास…
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले असून क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच या स्पर्धेत मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले असून हा कॉमनवेल्थ गेम्सचा विक्रम ठरला आहे.
मुंबईः कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) सुरु झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी भारताने सुवर्ण यश मिळविले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वेटलिफ्टिंग (Weightlifting) स्पर्धेत भारताला सुवर्णपदक (gold medal) मिळवून दिले आहे. बर्मिंगहॅममध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली असून ती केवळ वेटलिफ्टिंगमध्ये मिळवण्यात आली आहेत. त्यापूर्वी शनिवारी संकेत महादेव सरगरने रौप्य आणि गुरुराजा पुजारीनेही कांस्यपदक जिंकले आहे. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) महिलांच्या वेटलिफ्टिंग 49 किलो गटात भारतासाठी हे पदक जिंकले आहे.
The exceptional @mirabai_chanu makes India proud once again! Every Indian is delighted that she’s won a Gold and set a new Commonwealth record at the Birmingham Games. Her success inspires several Indians, especially budding athletes. pic.twitter.com/e1vtmKnD65
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2022
कॉमनवेल्थ गेम्सचा विक्रम
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले असून क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच या स्पर्धेत मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले असून हा कॉमनवेल्थ गेम्सचा विक्रम ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्विट
मीराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताचा गौरव केला असल्याचे म्हटले आहे. बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केल्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्यांचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देत राहील असंही त्यांनी म्हटले आहे.
2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक
मीराबाई चानूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच मीराबाईने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. आता मीराबाई चानूने बर्मिंगहॅममध्ये चमकदार कामगिरी करून वेटलिफ्टिंग या खेळाला नवी दिशा दिली आहे.
मीराबाईचा सर्वोत्तम प्रयत्न
स्नॅचच्या तिसऱ्या प्रयत्नात मीराबाई चानूला 90 किलो वजन उचलता आले नाही पण स्नॅचमध्ये मीराबाईचा सर्वोत्तम प्रयत्न 88 किलो वजन उचलण्याचा होता, जो एक खेळ रेकॉर्ड आहे. चानूनंतर मेरी हनित्रा रोइल्या स्नॅचमध्ये दुसरी आली. मेरीने 76 किलो वजन यशस्वीपणे उचलले आहे. मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात 109 किलो वजन उचलले आहे. त्याचवेळी दुसऱ्या प्रयत्नातही तिने 113 किलो वजन उचलण्यात यश मिळवले आहे. मात्र, तिचा तिसरा प्रयत्न 115 किलो वजन उचलण्याचा होता, त्यात मात्र तिला अपयशी ठरली.