मोहम्मद शमीनं वैतागून घेतलेला निवृत्तीचा निर्णय, पण झालं असं की बदललं मन

Mohammad Shami : मोहम्मद शमीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने माजी गोलंदाज प्रशिक्षकासमोर आपलं म्हणणं मांडल. पण त्यानंतर मुख्य प्रशिक्षकाने दिलेला सल्ला कामी आला.

मोहम्मद शमीनं वैतागून घेतलेला निवृत्तीचा निर्णय, पण झालं असं की बदललं मन
"शमी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता, पण मी...", माजी प्रशिक्षकाने केला खुलासाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 3:47 PM

मुंबई : मोहम्मद शमी हे भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. शमीने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.असं असताना मोहम्मद शमीने 2018 तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.कारण यो यो चाचणीत फेल ठरल्याने त्याला भविष्य अंधूक दिसत होतं. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीने ग्रासला होता. क्रिकेटला रामराम ठोकण्यापूर्वी त्याने भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रशिक्षक भारत अरुण यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना त्याचा निर्णय ऐकून धक्काच बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासोबत भेट घालून दिली.शमीने वैयक्तिक कारण सांगत क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचं सांगितलं.2018 मध्ये भारतीय संघात मोहम्मद शमी ऐवजी दिल्लीच्या नवदीप सैनीची वर्णी लागली होती.

“2018 इंग्लंड टूरपूर्वी आम्ही फिटनेस टेस्ट घेतली. त्यात शमी फेल झाला. त्याचं संघातील स्थानही गेलं. तेव्हा तो मला भेटला आणि सांगितलं की, मी वैयक्तिरित्या त्रासलो आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फिटनेस आणि मानसिकतेवर होत आहे. याचा मला खुप राग आला असून क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची आहे. ” माजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर तात्काळ रवि शास्त्री यांच्याकडे घेऊन गेलो. तसेच त्याच्या निर्णयाबाबत त्यांना सांगितलं.तेव्हा रवि शास्त्री म्हणाले की, क्रिकेट व्यतिरिक्त काय करशील? तुला अजून काही करता येतं का? तुला चेंडू सोपल्यानंतर फक्त गोलंदाजी करण्याचं माहिती आहे.त्यानंतर रवि शास्त्री यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि नॅशनल क्रिकेट अकादमीत घाम गाळण्यास सल्ला दिला.

“तुला जो काही राग आला आहे त्यातून काहीतरी चांगलं बाहेर काढ. तुझ्या हातात चेंडू आहे आणि फिटनेस खराब आहे. जो काही राग काढायचा आहे तो शरीरातून काढ. नॅशनल क्रिकेट अकादमीत 4 आठवडे राहा. घरी जाऊ नकोस.” रवि शास्त्री यांचा आदेश मोहम्मद शमीनं ऐकला आणि पुन्हा जोरदार कमबॅक केलं.

मोहम्मद शमीची क्रिकेट कारकिर्द

मोहम्मद शमीने आतापर्यत 61 कसोटी, 87 एकदिवसीय, 23 टी 20 आणि 93 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 219 गडी, एकदिवसीय सामन्यात 159 गडी, टी 20 स्पर्धेत 24 गडी, तर आयपीएलमध्ये 99 गडी बाद केले आहेत.फलंदाजीतही मोहम्मद शमीने कमाल दाखवली आहे. कसोटीत त्याने दोन अर्धशतकं झळकावली आहेत. शमीने कसोटी 722, एकदिवसीय सामन्यात 190, टी 20 त्याच्या नावावर एकही धाव नाही. तर आयपीएलमध्ये 69 धावा केल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.