Video: ‘वारंवार तसं बोलल्याने माझा ईगो…’, मोहम्मद शमीने अक्षर पटेलला सांगितलं आक्रमक खेळीचं गुपित
India Vs Austalia Test: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. फिरकीपटूंनी आपल्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवलं. पण असं असलं तरी मोहम्मद शमीच्या आक्रमक खेळीची चर्चा रंगली आहे. आता त्यानेच या मागचं गुपित सांगितलं.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. एक डाव आणि 132 धावांनी हा विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे वाटचाल सुरु केली आहे. हा सामना रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या फिरकीपटूंनी गाजवला. पण असं असलं तरी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फलंदाजीची जोरदार चर्चा रंगली. फलंदाजीत आक्रमकता पाहून उपस्थितांनी बोटं तोंडात घातली. मोहम्मद शमीने 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. आता या खेळीमागचं गुपित उघड झालं आहे. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अष्टपैलू अक्षर पटेलनं त्याचा इंटरव्यू घेतला. त्यात मोहम्मद शमीनं आपल्या आक्रमक खेळीबाबत सांगितलं.
व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षर पटेलनं विचारलं, “आज आमच्यासोबत नागपूरमध्ये मिस्टर लाला आले आहेत. इतक्या आत्मविश्वासाने आले. काय विचार करत होता?” शमीने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, “काही नाही मित्रा..तू तिथे फलंदाजी करत होता. माझी फक्त एकच भूमिका होती. जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर टिकून राहावं.धीर धरावा. पण तसं होत नव्हतं.” त्यानंतर अक्षरने त्याला पुन्हा विचारलं की, “मी सांगत होतो की, थंड राहा. मी बोललो डोक्यावर बर्फ ठेव..तू षटकार मारला..मी पुन्हा बोललो की, डोक्यावर बर्फ ठेव तू पुन्हा षटकार मारला.” शमीने या प्रश्नाला आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाला, “ईगो हर्ट होत होता.”
Of vital partnerships , smashing sixes and ice-cool attitude
Presenting post-match Nagpur Tales with @akshar2026 and @MdShami11 – By @RajalArora
FULL INTERVIEW #INDvAUS | #TeamIndia https://t.co/SZK9d5RfVr pic.twitter.com/dEbmhrCBjg
— BCCI (@BCCI) February 12, 2023
शमीने यापूर्वीही संघासाठी चांगली फलंदाजी केली आहे. 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्स मैदानावर शमी आणि बुमराहनं 9 गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
बॉर्डर गावसकर कसोटी स्पर्धा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा कसोटी सामना) – दिल्ली, भारत, 17-21 फेब्रुवारी
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – धर्मशाला, भारत, 1-5 मार्च
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली,अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भारत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव
ऑस्ट्रेलियन संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, मार्नस लाबुसेंज, मॅथ्यु रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, अॅश्टन अगर, कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, अलेक्स करे, पीटर हँडस्कॉम्ब, जोश हेझलवूड, लान्स मॉरिस,मॅथ्यू कुहनेमन, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, नाथन लॉयन, स्कॉट बोलँड, टोड मर्फी