अझरुद्दीन आणि सचिनची मॅचविनिंग पार्टनरशीप; अझरच्या खेळीने सेहवागही भारावला
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील मुंबईविरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीन आणि सचिन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी केली. | syed mushtaq ali trophy
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ( Syed Ali Mushtaq Trophy) स्पर्धेत बुधवारी केरळने मुंबईवर मात केली. केरळच्या मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddeen) आणि सचिन बेबी (Sachin Baby) यांनी नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघातील दोन माजी दिग्गज खेळाडुंशी असलेल्या नामसार्धम्यामुळे सध्या सोशल मीडियावर अझर-सचिन जोडगोळीची चांगलीच चर्चा आहे. (mohammed azharuddeen and sachin baby matchwinning partnership in syed mushtaq ali trophy)
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील मुंबईविरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीन आणि सचिन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 11 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे या T20 सामन्यात केरळने मुंबईवर आठ गडी राखून सहज विजय मिळवला. मोहम्मद अझरुद्दीन याने अवघ्या 54 चेंडूंत 137 धावा फटकावल्या. तर सचिन बेबीने सात चेंडूत दोन धावा केल्या.
सेहवागकडून अझरच्या खेळीचे कौतुक
मुंबईविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याने केलेल्या धडाकेबाज खेळीचे भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने कौतुक केले. वाह, अझरुद्दीन बेहतरीन! मुंबईसारख्या संघाविरुद्ध अशी खेळी करण्यासाठी बरीच मेहनत लागते. अझरुद्दीनने 54 चेंडूंत 137 धावा फटकावून एकहाती सामना फिरवला. त्याचा खेळ पाहून आनंद झाला, असे सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अझरुद्दीनची विक्रमी खेळी
मोहम्मद अझरुद्दीनने 54 चेंडूंत फटकावलेल्या 137 धावा हा T20 क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी श्रेयस अय्यरने T20 क्रिकेटमध्ये 147 धावा फटकावल्या होत्या. तर याच स्पर्धेत मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट याने 51 चेंडूत 146 धावांची तडाखेबंद खेळी केली होती.
Wah Azharudeen , behtareen !
To score like that against Mumbai was some effort. 137* of 54 and finishing the job on hand. Enjoyed this innings.#SyedMushtaqAliT20 pic.twitter.com/VrQk5v8PPB
— Virender Sehwag (@virendersehwag) January 13, 2021
तर T20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना बनवलेली ही दुसऱ्या क्रमांकाची खेळी आहे. 2014 मध्ये ल्यूक राईटने दुसऱ्या इनिंगमध्ये ससेक्स संघाविरुद्ध खेळताना 153 धावा ठोकल्या होत्या.
अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली, T20 मध्ये भारतीय फलंदाजाचं केवळ 17 चेंडूत शतक
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ( Syed Ali Mushtaq Trophy) बुधवारी मेघालय आणि मिझोरम (Meghalay Vs Mizoram) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट (Punit Bisht) याने 51 बॉलमध्ये तडाखेबाज 146 रन्स ठोकल्या. यामध्ये त्याने 17 षटकार खेचताना 102 रन्सचा पाऊस पाडला. याअगोदर क्रिकेटमध्ये असं कधीच झालं नाही की बॅट्समनने 17 चेंडूत 100 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
पुनीत बिष्टने खेळलेल्या धडाकेबाज 146 रन्सच्या खेळीत 102 रन्स फक्त षटकारांनी केले. त्याने एकूण 17 षटकार खेचले तर 6 चौकारही लगावले. चौकार-षटकारांमध्ये सांगायचं झालं तर त्याने 23 बॉलमध्ये 126 रन्स ठोकले. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या पुनीतने क्रमांका चारवर येऊन 286.27 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.
संबंधित बातम्या:
VIDEO : तब्बल 7 वर्षांनी श्रीसंतला पहिली विकेट, खाली वाकून पिचला ‘सलाम’
डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी
VIDEO | जखमा झेलूनही झुंजला, ड्रेसिंग रुममध्ये येताच कर्णधार रहाणेकडून अश्विनला कडकडून मिठी
(mohammed azharuddeen and sachin baby matchwinning partnership in syed mushtaq ali trophy)