T20 World Cup : मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाकडे रवाना, मोहम्मद कैफ-इरफान पठाणने वाढवलं प्रोत्साहन
पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळणार याची सुद्धा सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होत आहे. जगातील सोळा टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्या टीम (team) कसून सराव देखील करीत आहेत. काही सराव सामन्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात यापुर्वीच दाखल झाली आहे. परंतु शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शम्मी हे दोन खेळाडू काल ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.
View this post on Instagram
मोहम्मद शम्मीला कोरोना झाल्यामुळे तो यापुर्वी टीमसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नव्हता. परंतु काल तो ऑस्ट्रेलियात रवाना झाला. विमानात बसल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे.
मोहम्मद कैफ-इरफान पठाणने त्या पोस्टच्या खाली गुड लक अशी कमेंट करुन मोहम्मद शम्मीला प्रोत्साहित केले आहे.
पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळणार याची सुद्धा सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
टीम इंडियातील खेळाडूंची नावे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.