Mohammed Shami : मोहम्मद शमीला धमकी, दसऱ्याच्या शुभेच्छा देणं पडलं भारी
शमीला धमकी मिळाल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला आहे.
टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियासाठी (Australia) रवाना झाली आहे. या महिन्यात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियातील खेळाडू काल रवाना झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियासाठी अद्याप रवाना झालेला नाही. कालच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने ट्विटच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
On the happy occasion of Dussehra, I pray that Lord Ram fills your life with lots of happiness, prosperity, and success. Happy Dussehra to you and your family. #mdshami11 #Dussehra pic.twitter.com/wsFk7M1Gj5
हे सुद्धा वाचा— Mohammad Shami (@MdShami11) October 5, 2022
काल दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर शमीला काही जणांनी ट्विटवरती धमकी दिली आहे. ही कट्टरवाद्यांनी दिल्याची माहिती मोहम्मद शमीने सांगितली आहे. त्याचबरोबर शमीच्या विरोधात फतवा सुद्धा काढला आहे.
शमीला धमकी मिळाल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला आहे. काही कट्टरवाद्यांच्या तो सध्या निशाण्यावर आहे. त्यामुळे शमी आता पुढे काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जसप्रीत बुमराह जखमी झाल्यानंचतर मोहम्मद शम्मी अधिक चर्चेत होता. परंतु कोरोना झाल्याचे सांगितल्यामुळे विश्वचषकात सहभागी होण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला.