Team India : टीम इंडियाचे महत्त्वाचे तीन गोलंदाज आज ऑस्ट्रेलियात पोहोचणार
टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू यापुर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) फलंदाजांचा आत्मविश्वास चांगला झाला आहे. कारण त्यानंतर झालेल्या आफ्रिकेच्याविरुद्धच्या (SA) मालिकेतही टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने टीम इंडिया विजयी झाली. गोलंदाजांची मात्र दोन्ही मालिकेत निराशी केली, कारण समाधानकारक कामगिरी अद्याप झालेली नाही.
आशिया चषकापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा भरवशाचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
दीपक चाहर हा सुद्धा चांगली गोलंदाजी करीत होता. परंतु आफ्रिकेच्या विरुद्ध खेळत असताना त्याला सुद्धा दुखापत झाल्याने तो विश्वचषकाच्या बाहेर पडला आहे.
टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू यापुर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत सराव सामने सुद्धा खेळले आहेत.
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर हे गोलंदाज ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. यापैकी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळते हे सुद्धा पाहावं लागणार आहे.