मोहम्मद शमीची हॅटट्रिक आणि भारताचा विजय, शेवटच्या षटकाचा थरार
भारतीय संघाने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करत सलग चौथ्यांदा विश्वचषक सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 225 धावांचे आव्हान होते.
लंडन : भारतीय संघाने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करत सलग चौथ्यांदा विश्वचषक सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 225 धावांचे आव्हान होते. हा सामना संघर्षमय असा झाला. यामध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीनेही आपल्या संघासाठी शानदार खेळी केली. विश्वचषकात अफगाणिस्तानचा पहिला विजय होत असतानाच यामध्ये मोहम्मद शमीच्या एण्ट्रीने अफगाणिस्तानचा डाव पलटला. शमीने शानदार अशी गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. आता विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी बनला आहे. शमीच्या आधी चेतन शर्माने 1987 मध्ये विश्वचषक सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध हॅटट्रिक केली होती.
पाहा शेवटच्या षटकातील थरार
शमी गोलंदाजीसाठी आला तेव्हा अफगाणिस्तानला विजयासाठी अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर असलेल्या मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि भारताची धाकधूक वाढली.
अफगाणिस्तानला अजूनही 5 चेंडूत 11 धावांची आवश्यकता होती, पण इथेच सामना फिरला. दुसर्या चेंडूवर सेट झालेला नबी बाद झाला आणि भारताने कमबॅक केलं. यानंतर सलग आफताब आलम आणि मुजीब उर रेहमान यांची विकेट घेत शमीने भारताला या विश्वचषकातला सलग चौथा विजय मिळवून दिला.
आतापर्यंत विश्वचषकातील हॅटट्रिक
- चेतन शर्मा विरुद्ध न्यूझीलंड 1987
- सकलेन मुश्ताक विरुद्ध झिम्बाम्बे 1999
- सी वास विरुद्ध बांग्लादेश 2003
- ब्रेट ली विरुद्ध केन्ट 2003
- एल. मलिंगा विरुद्ध साऊथ आफ्रिका 2007
- के रोच विरुद्ध नेदरलँड 2011
- एस. फिन्न विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2015
- जेपी दुमिनी विरुद्ध श्रीलंका 2015
- मोहम्मद शमी विरुद्ध अफगाणिस्तान 2019
संबधित बातम्या :
भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक