AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातून मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल या खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs Team India 2nd Test) यांच्यात मेलबर्न इथे बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना आहे. या सामन्यातून टीम इंडियाच्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या युवा खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं आहे. (Mohammed Siraj and Shubhaman Gill makes his test debut against australia boxing day test at mcg)
टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ढिसाळ कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात एकूण 4 बदल करण्यात आले. यामध्ये दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. तर पृथ्वी शॉच्या जागेवर शुभमन गिल याला ताफ्यात दाखल करुन घेतलं.
The moment when your dreams come true. No better stage than the Boxing Day Test to make your maiden Test appearance. @RealShubmanGill is now the proud holder of India's Test cap ? No. 297. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/G0kdE9TgNU
— BCCI (@BCCI) December 25, 2020
सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलला टीम इंडियाची कॅप दिली. गिल टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण 297 वा खेळाडू ठरला. तर गोलंदाज मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं. सिराज टीम इंडियाचा 298 वा खेळाडू ठरला.
He battled personal tragedy, fought adversity and is now rewarded with India's Test ? no. 298. Congratulations Mohammed Siraj. Go seize the day! #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/D48TUJ4txp
— BCCI (@BCCI) December 25, 2020
सिराजची शानदार गोलंदाजी
मोहम्मद सिराजने पदार्पणातच शानदार गोलंदाजी केली. सिराजने ताज्या आकडेवारीनुसार एकूण 2 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मार्नस लाबुशाने आणि कॅमरॉन ग्रीन यांच्या विकेटचं समावेश आहे.
गिलच्या कामगिरीवर लक्ष
सिराजने पदार्पणातील सामन्यातील पहिल्या डावात 2 विकेट्स घेत चांगली सुरुवात केली. आता सलामीवीर शुभमन गिलच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळाली नाही. यामुळे गिलकडून टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची अपेक्षा असणार आहे.
सामन्याचा लेखाजोखा
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियांच्या गोलंदाजांनी कांगारुंना सुरुवातीपासून धक्के दिले. ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाचा 157-7 असा स्कोअर आहे. फिरकीपटू रवीचंद्नन अश्विनने 3, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशानेने 48 तर ट्रॅविस हेडने 38 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
AUS vs IND, 2nd Test 1st Day | कॅमरॉन पाठोपाठ कर्णधार टीम पेन आऊट, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
(Mohammed Siraj and Shubhaman Gill makes his test debut against australia boxing day test at mcg)