Mohammed Siraj IPL 2021 RCB Team Player : सिराज पुन्हा एकदा आयपीएल गाजवणार?
टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
मुंबई : टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याच दौऱ्यात त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्याने या दौऱ्यात शानदार कामगिरी केली होती. या दोऱ्यावेळी भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
सिराजने या कसोटी 4 सामन्यांच्या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट्स घेतल्या. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. तसेच या मालिकेतील त्याच्या कामगिरीने जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु मुळात गेल्या दोन वर्षांमधील आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर सिराजसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले होते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा सिराज आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.
सिराजची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
सिराजने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 16 विकेट्स मिळवल्या आहेत. 73 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला एकाच एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. परंतु त्यात त्याला विकेट्सचं खातं उघडता आलेलं नाही. तर 3 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 3 बळी मिळवले आहेत.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
चेंडू
|
निर्धाव
षटकं
|
धावा
|
विकेट्स
|
सर्वोत्तम
गोलंदाजी
|
इकोनॉमी
|
सरासरी
|
स्ट्राईक
रेट
|
4W
|
5W
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2020–
|
5
|
10
|
962
|
39
|
452
|
16
|
5/73
|
2.81
|
28.2
|
60.1
|
0
|
1
|
एकदिवसीय
2019
|
1
|
1
|
60
|
0
|
76
|
0
|
0/76
|
7.60
|
–
|
–
|
0
|
0
|
टी-20
2017–18
|
3
|
3
|
72
|
0
|
148
|
3
|
1/45
|
12.33
|
49.3
|
24.0
|
0
|
0
|
सिराजची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी
43 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये सिराजने 168 विकेट्स मिळवल्या आहेत. 59 धावांत 8 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 46 लिस्ट ए सामन्यांमध्ये सिराजने 81 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. 37 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 67 टी-20 सामन्यांमध्ये त्याने एकूण 90 बळी मिळवले आहेत. 20 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आयपीएलमध्ये डंका
सिराज गेल्या चार वर्षांपासून आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याला 35 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या 35 सामन्यांमध्ये त्याने 27.8 च्या सरासरीने 39 बळी मिळवले आहेत. 32 धावा 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सामने | चेंडू | धावा | विकेट्स | सर्वोत्तम गोलंदाजी | सरासरी | इकोनॉमी | स्ट्राईक रेट | 4W | 5W | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कारकीर्द | 35 | 716 | 1,084 | 39 | 4/32 | 27.79 | 9.08 | 18.35 | 1 | 0 |
2020 | 9 | 163 | 236 | 11 | 3/8 | 21.45 | 8.68 | 14.81 | 0 | 0 |
2019 | 9 | 169 | 269 | 7 | 2/38 | 38.42 | 9.55 | 24.14 | 0 | 0 |
2018 | 11 | 246 | 367 | 11 | 3/25 | 33.36 | 8.95 | 22.36 | 0 | 0 |
2017 | 6 | 138 | 212 | 10 | 4/32 | 21.20 | 9.21 | 13.80 | 1 | 0 |
संबंधित बातम्या
Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
(Mohammed Siraj IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)