कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा
कोरोनाने (Corona) एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले आहेत. एमके कौशिक (MK Kaushik) आणि रविंदर पाल सिंह (Ravinder Pal Singh) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
नवी दिल्ली : माजी भारतीय हॉकीपटू (Indian Hockey Player) आणि प्रशिक्षक एमके कौशिक (MK Kaushik) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. कौशिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक (Moscow Olympics Hockey Gold medallists) विजेत्या टीम इंडियाचे सदस्य होते. कौशिक यांना दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. कौशिक यांच्या मृत्यूमुळे हॉकीसह क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. (Moscow Olympics Hockey Gold medallists Ravinder Pal Singh and MK Kaushik passed away due to corona)
कौशिक यांच्या पत्नींनाही कोरानाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कौशिक यांनी हॉकीसाठी अमूल्य योगदान दिलं होतं. ते 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठीचे हे अखेरचे पदक ठरले. यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी पदक मिळवता आलेले नाही. कौशिक यांनी प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. कौशिक यांनी टीम इंडियाच्या महिला आणि पुरुष संघाला हॉकीचे धडे दिले होते. कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 मध्ये भारतीय महिला हॉकी टीमने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती.
Really sad day for Indian hockey and Indian sport. Two legends have passed away in a single day succumbing to covid-19 complications – Ravinder Pal Singh and MK Kaushik. Both were 1980 Moscow Olympics Hockey Gold medallists. Just too shocked ?
— Viren Rasquinha (@virenrasquinha) May 8, 2021
रवींदर पाल यांचंही निधन
दरम्यान आज सकाळी (8 मे) माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंह (Ravinder Pal Singh) यांचही कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 65 वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची मागील 2 आठवड्यांपासून कोरोना विरुद्ध झुंज सुरु होती. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी लखनऊ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाल देखील 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते.
संबंधित बातम्या :
PHOTO | सचिन, विराटनंतर रिषभ पंत कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात, ‘या’ संस्थेद्वारे करणार मदत
VIDEO | ‘सोड म्हटलं तर धरलं, धर म्हटलं तर सोडलं’, सूर्यकुमारचा ड्रोनसोबतचा पकडा-पकडीचा खेळ पाहिला का?
(Moscow Olympics Hockey Gold medallists Ravinder Pal Singh and MK Kaushik passed away due to corona)