धोनीचा सर्जरीनंतर स्पेशल फोटो आला समोर, एअरपोर्टवर झाली ‘या’ खेळाडूशीही भेट

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

धोनीचा सर्जरीनंतर स्पेशल फोटो आला समोर, एअरपोर्टवर झाली 'या' खेळाडूशीही भेट
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:09 PM

MS Dhoni : आपल्या कूलनेससाठी प्रसिद्ध असलेला , सर्वांचा लाडका खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) गुडघ्यावर नुकतेच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो घरी परत जात असताना एअरपोर्टवर त्याची टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूशीही भेट झाली. तो खेळाडू म्हणजेच मोहम्मद कैफ. एअरपोर्टवरील धोनी आणि कैफच्या (Mohammad Kaif) भेटीचे फोटोही समोर आले आहेत. मुंबई विमानतळावर झालेल्या या भेटीत धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाही उपस्थित होत्या.

कैफने धोनीच्या कुटुंबीयांसह त्याचीही भेट घेतली. कैफची पत्नी आणि मुलगा कबीरही तिथे होते. याशिवाय धोनीने कैफच्या मुलासोबत वेगळा फोटो क्लिक काढल्याने त्याच्या चेहऱ्यावर वेदळेच हास्य विलसत होते. मोहम्मद कैफने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून या भेटीची माहिती दिली.

त्यासोबतच कैफने एक छानशी कॅप्शनही लिहीली होती. ‘आम्ही आज विमानतळावर एक महान व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना भेटलो. शस्त्रक्रिया करून तो घरी परत येत होता. (त्याला भेटल्यावर) माझा मुलगा कबीर खूप आनंदी आहे कारण धोनीने त्याला सांगितले की तो देखील लहानपणी (कबीरसारखा) फुटबॉल खेळायचा.’ ‘लवकर बरा व्हा चॅम्प, भेटू पुढच्या हंगामात’ अशा शुभेच्छाही मोहम्मद कैफने धोनीला दिल्या.

विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनी दुखापतीनंतरही या आयपीएलमध्ये खेळत राहिला आणि संघाला पाचव्यांदा चॅम्पियन बनवले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो त्रस्त होता, लंगडतही चालत होता. पण तरीही धोनी संघाच्या हितासाठी खेळत राहिला. तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा.

चेन्नईला आयपीएलमध्ये पाचवे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर धोनीने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्याच मुंबईत त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रिया करून तो घरी परतला आहे. मात्र, त्याला तंदुरुस्त होऊन सावरायला वेळ लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.