MS Dhoni : Live मॅचमध्येच धोनीने मुंबईच्या खेळाडूवर उगारली बॅट, Video व्हायरल
आयपीलचा नवा सीझन नुकताच सुरू झाला. काल चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर विजयात मिळवला, त्यावेळी चाहत्यांना एमएस धोनीची जादूही पाहायला मिळाली. लाईव्ह मॅचमध्ये धोनीने अशी बॅट चालवली, त्याचा अंदाज पाहून चाहतेही चकित झाले.

आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला. पण चेन्नई सुपरकिंग्जसाठी यापेक्षा उत्तम सुरूवात झाली नसती. नवीन हंगामातील चेन्नईचा पहिलाच सामना घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर खेळला आणि पाहिला गेला. पहिला सामना हा चेन्नईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स विरुद्ध होता आणि सीएसकेने हा सामना अगदी सहज जिंकला. संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपली जादू दाखवत हा विजय आणखीनच खास बनवला.
धोनीला त्याच्या बॅटची फार जादू दाखवण्याची संधी मिळाली नाही, पण तीच बॅट त्याने एका खेळाडूवर चालवली, ज्याचे काही व्हिडीओ , फोटोही व्हायरल झाले आहेत.
चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात धोनीने आपल्या उत्कृष्ट यष्टिरक्षणाने मुंबईची सर्वात मोठी विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला यष्टीचीत करून त्याने चेपॉक स्टेडियममध्ये खळबळ उडवून दिली. स्टेडियममधील गोंगाट शिगेला पोहोचला होता. यानंतर 19व्या षटकात धोनी फलंदाजीला आला तेव्हा स्टेडियममध्ये पुन्हा तेवढाच गोंगाट झाला. धोनीच्या बॅटमधून एकही धाव आली नसली, तरी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहण्यासाठी चाहत्यांसाठी पुरेसं होता.
धोनीने चहरला बॅटने फटकावलं
त्यानंतर 20व्या षटकात रचिन रवींद्रने बॅटमधून सामना जिंकणारा शॉट लगावला. चेन्नईच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करू लागले. यावेळी धोनी मुंबईच्या खेळाडूंशी बोलत होता आणि हस्तांदोलन करत होता पण त्यावेळी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहर त्याच्या समोरून गेला. चहर धोनीसमोर काहीतरी बोलला आणि धोनीने लगेच बॅट उचलून त्याच्यावर चालवली. पण धोनीने हे रागाच्या भरात केले नाही, तर ती फक्त एक गंमत होती.
Deepak Chahar MS Dhoni ke saath masti karta rehta hai, aur isiliye Dhoni bhi apne bat se isko ‘treatment’ dete hue—ekdum funny andaaz mein! Yeh scene toh blockbuster hai.😂#deepakchahar #msdhoni #dhoni #CSKvsMI pic.twitter.com/dMLgfSXqML
— I Love my India 🇮🇳❤️ (@teenagers50) March 23, 2025
खरंतर, दीपक चहर हा सलग 7 सीझन चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये होता, तेव्हा त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली त्या संघासाठी अनेक चमकदार कामगिरी केली. धोनीसोबतची त्याची मैत्रीही खूप खास आहे, ती मैदानावर तसेच मैदानाबाहेरही अनेकदा दिसली आहे. त्यामुळे तो अनेकदा धोनीसोबत मजामस्ती करताना दिसतो. यावेळी असेच काहीसे घडले, तेव्हाच धोनीने मुंबईच्या संघातील चहरला मजेशीर पद्धतीने बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आणि चहरनेही स्वत:ला वाचवण्यासाठी उडी मारली. दोघांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून नेटीजन्सनाही तो आवडला आहे.
CSK विरुद्ध MI ची हार
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि संघाला 20 षटकात केवळ 155 धावा करता आल्या. या सामन्यात रोहित शर्मा आपले खातेही उघडू शकला नाही. मुंबईसाठी तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर चहरनेही 28 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदने 4 आणि खलील अहमदने 3 बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने हे लक्ष्य 19.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. त्यासाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने अवघ्या 26 चेंडूत 53 धावा केल्या, तर रचिन रवींद्र 65 धावा करून नाबाद माघारी परतला.