VIDEO: शान न इसकी जाने पाये…, धोनीला देशवासियांचा सॅल्युट

हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताने टी ट्वेण्टी मालिकाही 1-2 ने गमावली. या पराभवाचं शल्य भारतीय क्रिकेटप्रेमींना असलं, तरी टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) देशप्रेम पाहून क्रिकेटप्रेमींचा उर देशप्रेमाने भरुन आला. भारताला या सामन्यात 213 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारताला 20 […]

VIDEO: शान न इसकी जाने पाये..., धोनीला देशवासियांचा सॅल्युट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताने टी ट्वेण्टी मालिकाही 1-2 ने गमावली. या पराभवाचं शल्य भारतीय क्रिकेटप्रेमींना असलं, तरी टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) देशप्रेम पाहून क्रिकेटप्रेमींचा उर देशप्रेमाने भरुन आला. भारताला या सामन्यात 213 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारताला 20 षटकात 208 धावाच करता आल्या.

या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील धोनीचं देशप्रेम पाहून तुम्ही आम्ही सगळेच त्याला कडक सॅल्युट करतील. धोनीचं प्रसंगावधान, चाणाक्ष बुद्धीमत्ता केवळ क्रिकेटदरम्यानच पाहायला मिळते असं नाही, तर त्याची प्रचिती वेळोवेळी येत असते. कालच्या सामन्यादरम्यान धोनीने भारताच्या तिरंग्याची शान राखली.

मैदानात नेमकं काय झालं? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान, धोनीचा एक फॅन तिरंगा घेऊन मैदानात घुसला. सुरक्षाकवच तोडून तो धोनीच्या दिशेने धावत आला. धोनी त्यावेळी विकेटकीपिंग करत होता. तो फॅन आला आणि तिरंग्यासह धोनीच्या पाया पडू लागला. त्याचवेळी भारताचा तिरंगा खाली जमिनीवर टेकणार होता, इतक्यात धोनीने आधी तिरंगा हातात घेतला. त्यानंतर मग आलेल्या फॅनला उठवलं.

धोनीचं हे देशप्रेम पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष करुन धोनीबद्दल आदर व्यक्त केला. या सामन्याची कॉमेंट्री करणाऱ्यांनीही धोनीच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. ज्या वेगाने धोनी स्टम्पिंग करुन एखाद्या फलंदाजाला बाद करतो, त्याच वेगाने धोनीने तिरंगा उचलला.

धोनीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहे. VIDEO:

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.