धोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी!

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच चेन्नईला गुडबाय करेल, अशी भविष्यवाणी टीम इंडियाची माजी सलामीवीर आणि आघाडीचा समालोचक आकाश चोप्राने केली आहे. (MS Dhoni Will Leave Chennai Super Kings Says Akash Chopra)

धोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी!
एम एस धोनी
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 6:59 AM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) लवकरच चेन्नईला  गुडबाय करेल, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि आघाडीचा समालोचक आकाश चोप्राने (Akash Chopra) केली आहे. धोनीचं सध्याचं वय पाहता तसंच गेल्या काही दिवसांतला त्याचा संथ खेळ आणि फॉर्म पाहता तो लवकरच चेन्नईला सोडेन, अशी मोठी भविष्यवाणी आकाश चोप्राने केली आहे. (MS Dhoni Will Leave Chennai Super Kings Says Akash Chopra)

जागतिक क्रिकेटमध्ये महेंद्रसिग धोनी नावाचं वलय मोठं आहे. आता धोनीचं दिवेसंदिवस वय वाढत चाललं आहे. अशावेळी जुन्या फॉर्ममध्ये धोनी दिसत नाहीय. त्याच्या बॅटमधून धावा बरसत नाहीयत. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 7 सामन्यांत त्याने केवळ 38 धावा काढल्या. त्यामुळे आता धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अशातच चोप्राने धोनीच्या निवृत्तीवरुन मोठी आकाशवाणी केली आहे.

धोनी चेन्नईला सोडणार

येणाऱ्या काही काळांत धोनी स्वत: चेन्नईला गुड बाय करेल, असा मोठी भविष्यवाणी आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर केली. तो म्हणाला, “ज्यावेळी प्लेअर रिटेन करण्याची वेळ येईल त्यावेळी चेन्नई धोनीला सगळ्यात रिटेन करणाऱ्या यादीमध्ये शीर्षस्थानी ठेवेल. परंतु अशा वेळीआधी धोनी स्वत:च चेन्नईला गुड बाय म्हणून क्रिकेटला रामराम ठोकेल”

धोनीवर आता चेन्नई पैसा लावणार नाही

गेल्या काही दिवसांतला धोनीचा परफॉर्मन्स पाहता चेन्नई आता धोनीवर पैसा लावणार नाही. रिटेन करण्याच्या बाबतीत धोनीचं नाव वरच्या क्रमांकावर असेल. अनेक यादगार मॅचेस जिंकून देणाऱ्या धोनीच्या आता शेवटच्या काही मॅचेस राहिल्यात, असंही चोप्रा म्हणाला.

दीपक चाहरची मोठी भविष्यवाणी

कोरोना व्हायरसच्या मैदानातील एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. येत्या 31 मे रोजी बीसीसीआयची एक महत्तपूर्ण बैठक होतीय. या बैठकीत आयपीएलच्या उर्वरित सामन्यांविषयी मोठ्या घोषणेची शक्यता आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्जचा स्टार बोलर दीपक चाहरने (Deepak Chahar) एक मोठी भविष्यवाणी केलीय. आयपीएलच्या उर्वरित सामन्यात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) धमाका करेल, असं भाकित त्याने वर्तवलं आहे.

आयपीएलच्या 14 व्या पर्वात धोनीची खराब परफॉर्मन्स

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने आयपीएलच्या 14 व्या पर्वात 7 सामन्यांत बॅटिंग केली त्यामध्ये त्याने अवघ्या 37 धावा केल्या. आयपीएल 14 मध्ये धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सना होती. मात्र असं काही झालं नाही. उलट धोनी अगदीच संथ झालेला पाहायला मिळाला.

(MS Dhoni Will Leave Chennai Super Kings Says Akash Chopra)

हे ही वाचा :

Video : ”तू इतका बारीक माझी बॅट तरी उचलेल का?”, सूर्यकुमार यादवकडून चहलची मस्करी

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.