MS Dhoni : ‘डॅडा, गले लगा ले’, बाप लेकीचा हृदयाला भिडणारा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर
माहीची मुलगी झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुंदर फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोत धोनीने झिवाला आपल्या मिठीत घेतलंय. झिवाच्या चेहऱ्यावरही जगातला सर्वोत्तम आनंद दिसतोय. (MS Dhoni With His Daughter Ziva Dhoni Cute photo On Instagram)
मुंबई : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) परिवाराविषयी नेहमी चर्चा होते. त्याची पत्नी साक्षी, धोनीची मुलगी झिवा यांच्याविषयी चाहत्यांना नेहमी आकर्षण राहिलेलं आहे. सध्या धोनी आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करण्यात व्यस्त आहे. अशातच धोनीची मुलगी झिवाच्या (Ziva Dhoni) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बापासोबतचा एक हृदयाला भिडणारा फोटो पोस्ट केला गेला आहे. ज्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे बाप लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. (MS Dhoni With His Daughter Ziva Dhoni Cute photo On Instagram)
माहीचं त्याच्या लेकीवर म्हणजेच झिवावर खूप प्रेम आहे. तो जरी मॅचसाठी दौऱ्यावर असेल तरीही तिची विचारपूस करत असतो. तिला हवं नको विचारत असतो. साक्षीच्या म्हणण्यानुसार, या बाप लेकीचं नातं खूप वेगळं आहे. दोघांनाही एकमेकांशिवाय राहवत नाही.
‘माही’च्या मिठीत लेक झिवा
माहीची मुलगी झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुंदर फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोत धोनीने झिवाला आपल्या मिठीत घेतलंय. झिवाच्या चेहऱ्यावरही जगातला सर्वोत्तम आनंद दिसतोय. हा हृदयीस्पर्शी फोटो इंटरनेवर वेगात व्हायरल होतोय. ज्यांच्यावर धोनीचे चाहते कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
साक्षी आणि झिवा यंदा आयपीएलच्या मॅचेसला उपस्थित नाही
आयपीएलचं 14 वं सुरु असताना साक्षी आणि झिवा या दोघाही मॅच पाहण्यासाठी मैदानात उपस्थिती लावत नाहीयत. साहजिक कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या काळात धोनीने आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी दोघींनाही घरीच राहण्याचा सल्ला दिलेला असावा.
धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या आई बाबांनीही कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. त्यांना रांचीमधल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांच्या घरी आयसोलेट करण्यात आलं आहे, अशी माहिती मिळत आहे. आई बाबांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही धोनीने चेन्नईचं नेतृत्व करणं सुरुच ठेवलं.
चेन्नईची विजयी घौडदौड
आयपीएलच्या 14 व्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईची टीम सध्या जोरदार फॉर्मात आहे. चेन्नईने खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यांत धोनीच्या यलो आर्मीने विजय संपादन केला आहे तर केवळ एका सामन्यात चेन्नईला पराभवाचं तोंड पाहायला लागलं आहे. चेन्नईने 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून 10 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
(MS Dhoni With His Daughter Ziva Dhoni Cute photo On Instagram)
हे ही वाचा :
कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज
IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!