Happy Birthday Dhoni : सर्वात यशस्वी कर्णधार ते ‘सिक्सर किंग’; धोनीचे 5 रेकॉर्ड; त्या रेकॉर्डना त्याच्या रक्ताचा आणि घामाचा गंध आहे
महेंद्रसिंग धोनीची विकेटच्या मागे असलेली चपळता क्रिकेट चाहत्यांना प्रचंड भावली आहे. धोनी ज्या स्पीडने स्टंपिंग करायचा, ते पाहून बॅट्समन थक्क झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 123 स्टंपिंग केले आहेत. 100 स्टंप आऊट टच करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
मुंबईः भारतीयांच्या गळ्यात ताईत बनलेला विराट कोहली एकदा म्हणाला होता की, ‘मला महेंद्रसिंग धोनीबद्दल (Mahendra Singh Dhoni) प्रचंड आदर आहे, तो माझ्या नजरेत नेहमीच खूप उंच असेल कारण मला माहित आहे की कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही बदल करणे किती कठीण असते आणि ते महेंद्रसिंग धोनीनी सहज स्वीकारलं होतं’ महेंद्रसिंग धोनी विराटच कौतुक करतो असं नाही तर देशातील आणि परदेशातीलही अनेक दिग्गज त्याच्या खेळाचे आणि खिलाडूवृत्तीच्या कौतुकाचे सगळ्यानाच अप्रूप आहे. आज महेंद्रसिंग धोनी याचा वाढदिवस त्यानिमित्त…
भारतीय संघाचा माजी कर्णधार (Former captain of the Indian team) आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज (Wicketkeeper-batsman) महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 जुलै 1981 रोजी रांची येथे जन्मलेल्या धोनीने क्रिकेट विश्वात अशा उंचीला स्पर्श केला आहे की ती उंची गाठण्याची प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न बनले आहे.
यशस्वी कर्णधारः यशस्वी फलंदाज
तो जसा यशस्वी कर्णधार तर होता तसाच तो यशस्वी फलंदाजही होता. फिनिशर म्हणून त्याची भूमिका क्वचितच कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकेल. मात्र दशकाहून अधिक काळ आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आणि तो चाहत्यांच्या दिलावर आणखी विराजमान झाला.
विक्रमाना रक्ताचा आणि घामाचा गंध
धोनीने 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 90 कसोटी सामन्यांच्या 114 डावांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके केली. धोनीने कसोटीपेक्षा वनडेत चांगली सरासरी काढली. त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.58 च्या सरासरीने 10773 धावा केल्या होत्या. त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतक ठोकली. त्याच वेळी धोनीने 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.6 च्या सरासरीने 1617 धावा केल्या. त्याने टी-20 मध्ये केवळ दोन अर्धशतके झळकावली होती. विशेष म्हणजे धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यातील महत्वाचे पाच आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. धोनीचे जे पाच विक्रम आहेत,त्या जागतिक विक्रमाना त्याच्या रक्ताचा आणि त्याच्या घामाचा त्याला गंध आहे.
महेंद्रसिंग धोनीचे 5 मजबूत रेकॉर्ड
जगातील एकमेव कर्णधार
धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असला तरी त्याने खेळाची धोनी नावाची शैली क्रिकेट या खेळाला प्रधान केली आहे. जी आजपर्यंत इतर कोणताही कर्णधार करू शकला नाही. 3 आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक (2007), एकदिवसीय विश्वचषक (2011) आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) जिंकली आहे.
सर्वाधिक वेळा नाबाद
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. एकदिवसीय कारकिर्दीत तो 84 वेळा नाबाद राहिला. 84 पैकी 51 वेळा आपले लक्ष्य गाठण्यासाठी धोनी नाबाद राहिला असल्याची माहिती आहे. या काळात भारताने 47 वेळा विजयावर नाव कोरले आहे. त्याच्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू शॉन पोलॉक आहे. पोलॉक 72 वेळा नाबाद राहिला.
जगात दुसऱ्या क्रमांकावर
त्याच्या नेतृत्वाखालील कोणताही खेळाडू संघाला जास्तीत जास्त विजय मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहिला. एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून 110 एकदिवसीय सामने जिंकले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 165 एकदिवसीय सामने जिंकले होते.
सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम
महेंद्रसिंग धोनीची विकेटच्या मागे असलेली चपळता क्रिकेट चाहत्यांना प्रचंड भावली आहे. धोनी ज्या स्पीडने स्टंपिंग करायचा, ते पाहून बॅट्समन थक्क झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 123 स्टंपिंग केले आहेत. 100 स्टंप आऊट टच करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
षटकारांचा मास्टर
धोनी हा खरं तर लांब षटकार मारणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 359 षटकार ठोकले आहेत. धोनीने कसोटीत 70 षटकार, एकदिवसीय सामन्यात 229 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 52 षटकार मारले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, धोनी एका प्रकरणात षटकारांचा मास्टर असल्याचे सिद्ध झाले. एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 वेळा सहा षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.