IPL 2021 : आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, आकाश चोप्राचं नेमकं उत्तर!

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं आकाश चोप्राने सांगितलं. | Mumbai Indians dangerous team In IPL 2021 Aakash Chopra

IPL 2021 : आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, आकाश चोप्राचं नेमकं उत्तर!
Aakash Chopra
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 8:45 AM

मुंबईआयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमातील रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत. संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शक मंडळ प्रतिस्पर्धी संघाला कशी मात द्यायची यासंबंधी रणनिती आखण्यात व्यक्त आहे. तर प्रेडेक्शिनिस्ट आणि कॉमेंटेटर आयपीएलच्या 14 व्या मोसमात काय काय होऊ शकतं, याचा अंदाज लावत आहेत. समालोचक आकाश चोप्राला (Aakash Chopra) आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, असा प्रश्न विचारला असता त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं सांगितलं. (Mumbai Indians dangerous team In IPL 2021 Says Aakash Chopra)

एका युट्यूब फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स ही या मोसमातील सगळ्यात विस्फोटक आणि करंडकाची प्रबळ दावेदार असलेली टीम सांगितली. मुंबईजवळ रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्या, पांड्या ब्रदर्स असे एकाहून एक विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला रोखणं प्रतिस्पर्धी संघासाठी अवघड जाणार आहे, असं आकाश चोप्रा म्हणाला.

मुंबई इंडियन्सची ताकद काय?

मुंबई इंडियन्स हा एक संतुलित संघ आहे. ज्या संघांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचं उत्तम मिश्रण आहे तसंच संतुलन देखील आहे. मुंबईजवळ रोहित-क्विंटन सारखे जगातले विस्फोटक ओपनर बॅट्समन आहेत. तथा डिकॉकला पर्याय म्हणून इशान किशन सारखा युवा भारतीय फलंदाज आहे जो संधी मिळताच सूर्यासारखा तळपतो. तसंच ख्रिस लिनसारखा पर्यायी ओपनरही आहे.

इशान किशान, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या असे एकाहून एक सरस फलंदाज मुंबईच्या संघात आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात मुंबई धावांचा डोंगर रचेल. हा डोंगर पोखरु न देण्याचं काम मुंबईचे गोलंदाज करतील आणि मुंबईच्या गोलंदाजीचा भार सांभाळेल जगातील सर्वांत खतरनाक गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह… एका संघाला जिंकण्यासाठी दुसरं काय हवं असतं, असंही आकाश चोप्रा म्हणाला.

आयपीएलचं रण सज्ज

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Mumbai Indians dangerous team In IPL 2021 Says Aakash Chopra)

हे ही वाचा :

रवी शास्त्री यांनी घेतली भगतसिंह कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

सेहवाग गंभीरला स्थान, पण सचिन -धोनीला नाही, या दिग्गज खेळाडूची IPL टीम पाहिलीत का?

युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.