चेन्नईवर सलग तिसऱ्यांदा मात, मुंबई इंडियन्सची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक

चेन्नई : मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सने मात करत पाचव्यांदा फायनलचं तिकीट बूक केलंय. चेन्नईने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. चेन्नईला फायनलचं तिकीट गाठण्यासाठी आणखी एक संधी असेल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विजयी संघासोबत चेन्नईचा सामना होईल. त्या सामन्यातील विजयी […]

चेन्नईवर सलग तिसऱ्यांदा मात, मुंबई इंडियन्सची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

चेन्नई : मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सने मात करत पाचव्यांदा फायनलचं तिकीट बूक केलंय. चेन्नईने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. चेन्नईला फायनलचं तिकीट गाठण्यासाठी आणखी एक संधी असेल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विजयी संघासोबत चेन्नईचा सामना होईल. त्या सामन्यातील विजयी संघाला फायनलमध्ये मुंबईचं आव्हान असेल.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. अंबाती रायुडू (42) आणि महेंद्र सिंह धोनी (37) यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीने चेन्नईला 131 धावांपर्यंत मजल मारुन दिली. मुंबईच्या गोलंदाजांनी सीएसकेच्या फलंदाजांना कमी धावात रोखण्यात यश मिळवलं. मुंबईकडून राहुल चहरने दोन, तर लसिथ मलिंगा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा केवळ चार धावा करुन माघारी परतला. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने टिच्चून फलंदाजी केली. त्याला ईशान किशनने साथ दली. किशन बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमार यादवने 54 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला मुंबईने सलग तीन वेळा हरवलंय. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपरकिंग्जला सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. विशेष म्हणजे सीएसकेच्या होमग्राऊंडवरही मुंबईच सर्वाधिक वेळा जिंकली आहे. मुंबईने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईने यापूर्वी 2013, 2015 आणि 2017 मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तर 2010 मध्ये पराभव झाला होता. यावेळी पाचव्यांदा प्रतिस्पर्धी संघ कोण असेल ते पाहणं औत्सुक्याचं आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....