MI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Retained and Released Players) IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे.
मुंबई : आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians Retained and Released Players) IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे. विविध संघ आज अनेक खेळाडूंना संघातून मुक्त करत आहेत. तर आयपीएल लिलावात नव्या खेळाडूंवर नजर असेल. आज अनेक संघानी बड्या खेळाडूंना मुक्त केलं. एकट्या मुंबई इंडियन्सने तब्बल 7 खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये मुंबई इंडियन्समध्ये पहिल्या मोसमापासून असलेल्या लसिथ मलिंगाचाही (Lasith Malinga) समावेश आहे.
मुंबई इंडियन्सने दुबईत झालेल्या आयपीएल 2020 चं जेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सच्या नावे आतापर्यंत पाच विजेतेपदं आहेत. नव्या मोसमात नव्या खेळाडूंसह उतरण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे.
मुंबई इंडियन्सकडून 7 खेळाडू रिलीज
मुंबईने सात बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिचेल मॅग्केघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेर्फन रुदरफोर्ड, फिरकीपटू बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख यांना मुंबई इंडिन्सने आपल्या संघातून मुक्त केलं आहे.
सध्या 18 जण ताफ्यात
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सध्या 18 खेळाडू आहेत. ज्या सात जागा रिक्त झाल्या आहेत, त्या येत्या आयपीएल लिलावात (IPL auction) भरल्या जातील, असं मुंबई इंडियन्सने म्हटलं. मुंबई इंडियन्स चार परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात समावेश करण्याच्या तयारीत आहे.
? Your 1️⃣8️⃣ retained Champions for #IPL2021 ??#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/yFjNmZZu9e
— Mumbai Indians (@mipaltan) January 20, 2021
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू (Mumbai Indians Retained players )
फलंदाज ( Batsmen):
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (WK), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (WK), ख्रिस लीन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (WK)
अष्टपैलू खेळाडू ( All-rounders)
किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय
Bowlers:
जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान
मुंबई इंडियन्सने मुक्त केलेले खेळाडू ( Mumbai Indians Released players) :
लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिचेल मॅग्केघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेर्फन रुदरफोर्ड, फिरकीपटू बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख
(Mumbai Indians Retained and Released Players)