IPL 2021 | ‘We Are Famly’, खेळाडू घरी पोहचत नाहीत तोवर आम्ही दिल्लीतच, मुंबई इंडियन्सनचा निर्धार
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. त्यानंतर अनेक खेळाडूंनी आपल्या घरची वाट धरली आहे.
मुंबई | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करावा लागला. त्यानंतर अनेक टीमच्या खेळाडूंनी परतीचा मार्ग धरला. बीसीसीआय आणि फ्रँचायजी एकूण 8 टीमच्या खेळाडूंना मायदेशी पाठवत आहेत. यादरम्यान (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सने आज (6 मे) इंस्टाग्रामवर आपल्या ताफ्यातील खेळाडूंना मायदेशी पाठवण्याबाबतचा प्लॅन सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चार्टर प्लेनने मालदीवला पाठवणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर ते खेळाडू 14 दिवस क्वांरटाईन राहतील. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खेळाडू मायदेशी परततील. मुंबईचा कोच महिला जयवर्धनेही मालदीवला जाणार आहे. (Mumbai Indians Team management will send their players from different countries home via charter planes)
क्वारंटाईनचे सर्वोत्तम नियोजन
मुंबई इंडियन्सकडून या खेळाडूंना मालदीवमध्ये क्वारंटाईन राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या खेळाडूंना ज्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार आहे तिथे उत्तम सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या देशातील खेळाडूंसाठीही चार्टर प्लेनची व्यवस्था केली आहे. यामध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजच्या खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला चार्टर प्लेनने ऑकलंडला सोडण्यात येणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना जोहान्सबर्ग तर वेस्टइंडिजच्या क्रिकेटपटूंना त्रिनिदादला सोडले जाणार आहे. तर भारतातील क्रिकेटपटू हे आपल्या घरी पोहचले आहेत.
मुंबई टीम मॅनेजमेंट दिल्लीत थांबणार
टीम मॅनेजमेंटने सर्व खेळाडूंना प्रवासादरम्यान कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, याबाबतची माहिती दिली आहे. या सर्व खेळाडूंना चार्टर प्लेनने मालदीवला घेऊन जाण्यात येणार आहे. त्या प्लेनमधील क्रू सदस्य 7 दिवस क्वारंटाईन होते. कोरोनामुळे स्पर्धा स्थगित केली तेव्हा मुंबईची टीम दिल्लीत होती. इथूनच सर्व खेळाडूंना इच्छित स्थळी पाठवण्यात आले. “बीसीसीआयच्या माध्यमातून विविध राज्यातील क्रिकेट बोर्डांना संबंधित खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे”, अशी माहिती मुंबईने दिली आहे. तसेच सर्व खेळाडू सुखरुप घरी पोहचेपर्यंत मुंबईची टीम मॅनेजमेंट दिल्लीतच थांबणार आहे.
उर्वरित सामने केव्हा?
कोरोनामुळे 14 व्या पर्वात 29 सामने खेळवण्यात आले. तर 31 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे हे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे खेळवण्यात येणार, याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र या उर्वरित मोसमातील सामन्याचे आयोजन कधी, कुठे आणि केव्हा खेळवण्यात येणार यावर बीसीसीआय आणि संबंधित अधिकारी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
संबंधित बातम्या :
IPL 2021 | बायो बबलमध्ये कोरोना कसा शिरला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतो…
Shikhar Dhawan | ‘गब्बर’ धवनने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शिखरकडून ट्विटरवर फोटो शेअर
(Mumbai Indians Team management will send their players from different countries home via charter planes)