Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा बुटांमुळे पुन्हा एकदा चर्चेत, चाहत्यांकडून कौतुक
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (hitman rohit shrma) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बुटाद्वारे पर्यावरणचा (give message about for environment) बचाव करण्याचा संदेश दिला.
चेन्नई : मुंबई इंडियन्सचा ((mumbai indians) कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा बुटांमुळे चर्चेत आला आहे. कोलकाता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर रोहितने अनेकांची मनं जिंकली आहेत. या सामन्यात रोहितने वन्यजीव आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासंबंधात एक खास संदेश दिला. रोहितने या सामन्यात प्लास्टिक मुक्त समुद्रासाठी आणि त्याबाबत जनमाणसात जागृती करण्यासाठी मोठा कासव असलेलं बुट घातले होते. रोहितने याबाबतचं ट्विट केलं आहे. रोहितच्या निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाबाबत त्याचं प्राणीमित्रांकडून कौतुक केलं जात आहे. (mumbai indians vs kolkata knight riders ipl 2021 hitman rohit shrma give message about for environment)
The other cause that’s extremely close to my heart. This one hits hard! This is a hundred percent in our control to reverse. I take my cause with me while I go out and do what I love! (1/2) pic.twitter.com/ZF5xP1zy9k
— Rohit Sharma (@ImRo45) April 14, 2021
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढतेय. या प्रदुषणाचा थेट परिणाम हा निसर्गावर पर्यायाने जैवविविधतेवर होत आहे. यामुळे अनेक प्राणी हे नामशेष होत आहेत. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने रोहित हे सर्व प्रयोग करतोय. रोहितने याआधीही अनेकदा जनजागृती केली आहे.
सलामीच्या सामन्यातही रोहितकडून संदेश
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सलामीचा सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातही रोहितने घातलेल्या बुटांवर एक शिंगी गेंड्याचं चित्र होतं. सध्या एक शिंगी गेंड्यांची प्रजाती लुप्त होत चालली आहे. ही प्रजाती नष्ट झाली तर कदाचित निसर्गातील परिसंस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. रोहितने यामुळे गेंड्यांच्या संरक्षणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी गेंड्यांचे चित्र असलेले बुट घातले होते. या बुटांवर ‘सेव्ह द रायनो’ म्हणजेच गेंड्यांना वाचवा असा संदेशही लिहिण्यात आला होता.
Yesterday when I walked on to the field it was more than just a game for me. Playing cricket is my dream and helping make this world a better place is a cause we all need to work towards. (1/2) pic.twitter.com/fM22VolbYq
— Rohit Sharma (@ImRo45) April 10, 2021
14 व्या मोसमातील पहिला विजय
मुंबईने मंगळवारी कोलकातावर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकाता विरुद्धचा विजय मुंबईचा या मोसमातील पहिला विजय ठरला. मुंबईने कोलकाताला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 142 धावाच करता आल्या. कोलकाताची 14.5 ओव्हरनंतर 3 बाद 122 अशी स्थिती होती. कोलकाताला विजयासाठी 31 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या 7 फलंदाजांना बाद केलं. यासह मुंबईने या मोसमातील पहिला विजय साकारला.
संबंधित बातम्या :
रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?
(mumbai indians vs kolkata knight riders ipl 2021 hitman rohit shrma give message about for environment)