Video | मुंबईच्या पलटण विरुद्ध भिडण्यासाठी ‘मिस्टर 360’ सज्ज, सलामीच्या सामन्याआधी काय म्हणाला डीव्हीलियर्स?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (royal challengers banglore) एबी डीव्हीलियर्स (ab de villiers) मैदानात चौफेर फटकेबाजी करतो. या 14 व्या मोसमातील (ipl 2021) सलामीचा सामना मुंबई (mumbai indians) विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. त्याआधी एबीने प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमाच्या ‘रन’संग्रामाला आजपासून सुरुवात होत आहे. या पर्वातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indias) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सलामीच्या सामन्याआधी बंगळुरुचा मिस्टर 360 या टोपणनावाने ओळखला जाणारा एबी डी व्हीलियर्सने प्रतिक्रिया दिली आहे. (mumbai indians vs royal challengers banglore ipl 2021 mister 360 ab de villiers is excited to playing against mi)
काय म्हणाला एबीडी?
“या मोसमातील हा पहिला सामना आहे. आम्ही या मॅचसाठी उत्साही आहोत. मुंबई इंडियन्स शानदार टीम आहे. त्यांनी अनेकदा विजेतेपद पटकावलं आहे. आमचा सामान कोणासोबत आहे, याची आम्हाला कल्पना आहे. प्रतिस्पर्धी संघ हा तगडा आहे. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे. आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत”, असं एबीडी म्हणाला आहे. बंगळुरुने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एबीडीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही संघात आक्रमक फलंदाज
उभयसंघात आक्रमक आणि एकहाती सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवणारे खेळाडू आहेत. मुंबईच्या ताफ्यात कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यासारखे तोडीसतोड फलंदाज आहेत. तर दुसऱ्या बाजूला बंगळुरुच्या गोटात विराट कोहली, एबीडी व्हीलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज आहेत. त्यामुळे या सलामीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना जोरदार फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.
दोघांपैकी तगडा संघ कोणता?
आयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी 17 सामन्यात पलटण मुंबईने बाजी मारली आहे. तर 9 सामन्यात बंगळुरुने मुंबईवर विजय मिळवला आहे. तर 1 सामना बरोबरीत सुटला होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुने जिंकला होता. म्हणजेच बंगळुरुने एकूण 10 सामने जिंकले आहेत.
मुंबईसमोर चेन ब्रेक करण्याचे आव्हान
आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 2 वेळा मोसमातील पहिला सामना खेळले आहेत. हे दोन्ही सामने बंगळुरुने जिंकले आहेत. बंगळुरुने मुंबईला 2008 आणि 2013 मोसमातील सलामीच्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे मुंबईसमोर हा सामना जिंकून पराभवाची चैन मोडण्याचे आव्हान असेल. तर बंगळुरुला हॅटट्रिक साधण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी यशस्वी कोण ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO | 2 द्विशतक आणि 1 त्रिशतक, कायरन पोलार्डला सलामीच्या सामन्यात अफलातून कारनामा करण्याची संधी
IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
(mumbai indians vs royal challengers banglore ipl 2021 mister 360 ab de villiers is excited to playing against mi)