IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, ‘हे’ तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर

मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकून इतिहास रचला. परंतु आयपीएलमध्ये असेही काही संघ आहेत ज्यांनी कधीही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही.

IPL | 13 वर्षात मुंबईने पाचव्यांदा किताब जिंकला, 'हे' तीन संघ मात्र अजूनही विजेतेपदापासून दूर
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 7:09 PM

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या अंतिम सामन्यात (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकून मुंबईच्या संघाने इतिहास रचला आहे. परंतु आयपीएलमध्ये असेही काही संघ आहेत ज्यांनी कधीही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. (Mumbai Indians won IPL 2020 trophy, Rohit Sharmas team become champion for 5th time)

13 पैकी 10 चषक मुंबई, चेन्नई, कोलकात्याकडे

आयपीएलमध्ये आठ संघ खेळतात. मधल्या काळात पुणे (Rising Pune Supergiant, Pune Warriors India), कोची (Kochi Tuskers Kerala) आणि गुजरात (Gujarat Lions) या संघांनाही संधी मिळाली होती. परंतु 13 वर्षांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेतील 10 चषक केवळ तीन संघांनी आपल्या नावे केले आहेत. यामध्ये मुंबईने पाच, चेन्नई सुपरकिंग्सने तीन आणि कोलकाता नाईट रायडर्सने दोन चषक जिंकले आहेत. तर शेन वॉर्न याचा राजस्थान रॉयल्स संघ, अॅडम गिलख्रिस्टचा डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघ (हा संघ आयपीएलमधून बाद झाला आहे, त्याच्याजागी सनरायझर्स हैदराबाद हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे.) आणि डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आतापर्यंत एकदा आयपीएलचा चषक उंचावला आहे.

दिल्ली, पंजाब आणि बँगलोरचा हाथ रिकामाच

आयपीएलचा 13 वा सीजन नुकताच संपला तरी अद्याप तीन असे संघ आहेत, ज्यांना कधीही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेलं नाही. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या तीन संघांनी कधीही आयपीएल चषक उंचावलेला नाही.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ आतापर्यंत तीन वेळा (2009, 2011, 2016) आयपीएल फायनलपर्यंत पोहोचला आहे. परंतु तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाब हा संघ 2014 मध्ये आयपीएल फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना पराभूत केले. दिल्लीचा संघ हा एकमेव असा संघ होता जो आयपीएलच्या फायनलपर्यंत कधीच पोहोचू शकला नव्हता. परंतु यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघांने पहिल्यांदाच आयपीएलची फायनल गाठली. परंतु मुंबईच्या संघाने त्यांचं विजेतेपद कायम राखत दिल्लीला पराभूत केलं.

आयपीएलचे 13 चॅम्पियन्स

मुंबई इंडियन्स : 2013, 2015, 2017, 2019, 2020 चेन्नई सुपरकिंग्स : 2010, 2011, 2018 कोलकाता नाईट रायडर्स : 2012, 2014 राजस्थान रॉयल्स : 2008 डेक्कन चार्जर्स : 2009 सनरायझर्स हैदराबाद: 2016

संबंधित बातम्या

IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

(Mumbai Indians won IPL 2020 trophy, Rohit Sharmas team become champion for 5th time)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.