200 टी 20 सामने खेळणारा मुंबई हा जगातील पहिला संघ
मुंबई : मुंबई इंडियन्सने टी 20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास आपल्या नावे नोंद केला आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध वानखेडेमध्ये उतरताच मोठी कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने टी 20 क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. 200 टी 20 सामने खेळणार मुंबई हा जगातील पहिलाच संघ आहे. इंग्लिश काउंटी […]
मुंबई : मुंबई इंडियन्सने टी 20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास आपल्या नावे नोंद केला आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध वानखेडेमध्ये उतरताच मोठी कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने टी 20 क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. 200 टी 20 सामने खेळणार मुंबई हा जगातील पहिलाच संघ आहे. इंग्लिश काउंटी क्रिकेट क्लब सॉमरसेट यांनी आतापर्यंत 199 सामने खेळले आहेत.
मुंबईने 2008 ते 2019 दरम्यान 200 सामने खेळले, पण यामधील 112 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 84 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. यामध्ये एक सामना टायब्रेकरमध्ये (सुपर ओव्हर) मुंबई इंडियन्सने जिंकला होता. सॉमरसेटने 2003 ते 2018 दरम्यान 199 सामने खेळले आहेत. यामध्ये 95 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. 2 सामने अनिर्णित राहिले होते आणि 9 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगला. यामध्ये नाणेफेक जिंकून विजय मिळवत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अंजिक्य रहाणे याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सला पहिली फलंदाजी करण्याची संधी दिली. मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. शर्माने संघात सिद्धेश लाड याची जागा घेतली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सुरुवातीला धडाकेबाज अशी कामगिरी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.