“क्या बोलती पब्लिक, रफ्तार की खोज…”, या मुलाच्या बॉलिंगचा वेग पाहून मुनाफ पटेल ही थक्क, पाहा व्हीडिओ
भारतीय संघात वेगवान गोलंदाजाची कायमच उणीव भासली आहे. कारण भारतीय खेळपट्ट्यांवर कायमच फिरकीची जादू चालली आहे. त्यामुळे विदेश दौऱ्यात त्याची उणीव भासली आहे.
मुंबई – भारतीय संघाच्या ताफ्यात कायमच वेगवान गोलंदाजांची उणीव भासली आहे. एक गोलंदाज चांगला चालला की त्याची जागा भरून काढणं कठीण होतं. आताही भारतीय संघाचं तसंच काहीसं झालं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि वनडे वर्ल्ड कपसाठी वेगवान गोलंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी खटाटोप सुरु आहे. पण मुनाफ पटेलनं एक व्हायरल व्हिडीओ शेअर करत भविष्यातील वेगवान गोलंदाजाचं रुप दाखवलं आहे. यात एक लहानगा वेगाने गोलंदाजी करताना दिसत आहे. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच फलंदाज त्रिफळाचीत झाल्याचं दिसून येतं.
मुनाफ पटेलनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “क्या बोलती पब्लिक इस बॉलर के लिए, रफ्तार की खोज” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कमी वयात इतक्या वेगाने गोलंदाजी करणं म्हणजे आश्चर्य आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संघात चांगले गोलंदाज पाहायला मिळतील यात आश्चर्य नाही.
Kya Bolti Public is Bowler ke liye, ? ? raftar ki khoj#icc #viral #speed #India #proud pic.twitter.com/0l7ASmUTiB
— Munaf Patel (@munafpa99881129) April 5, 2023
मागच्या वर्षी मुनाफ पटेलनं वेगवान गोलंदाज उमरान मलिकचं समर्थन केलं होतं. इतकंच काय तर उमरान मलिकला भारतीय संघात सहभागी करण्याची मागणी केली होती. उमरान मलिकला भारतीय संघात स्थान मिळाल असून त्याने 8 वनडे आणि 8 टी 20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने वनडेत 13 आणि टी 20 मध्ये 11 गडी बाद केले आहेत. उमरान मलिक आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे.
मुनाफ पटेल भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 13 कसोटी आणि 70 एकदिवसीय सामने खेळले आहेत. वनडे विश्वचषकात मुनाफ पटेलनं मोलाची भूमिका बजावली होती. 8 सामन्यात 11 गडी बाद केले होते. इतकंच काय तर त्याने धावगती रोखण्यासही मदत केली होती. विश्वचषकात मुनाफ पटेलचा इकोनॉमी रेट 5.36 इतका होता.