पॅरिस : फ्रेंच ओपनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत राफेल नदालने (Rafael Nadal) नोवाक जोकोविचवर (Novak Djokovic) 6-0 6-2 7-5 ने मात केली. कारकिर्दीतील 20 वे ग्रँडस्लॅम जिंकत रॉजर फेडररशी बरोबरी साधली. नदालने फ्रेंच ओपनमधील 100 वा विजय साजरा करत फ्रेंच ओपनचे 13 वे जेतेपद पटकावले. (Nadal beats Djokovic to win 13th French Open)
राफेल नदाल आतापर्यंत फ्रेंच ओपनमधील एकाही अंतिम सामन्यात पराभूत झालेला नाही. फ्रेंच ओपनच्या 13 व्या विजेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली आहे.
फ्रेंच ओपन में नडाल ने रचा इतिहास, 20वां ग्रैंड स्लेम जीत की फेडरर की बराबरी#RolandGarros | #RafaelNadal | #NovakDjokovic | #RogerFederer | #FrenchOpen2020 pic.twitter.com/SkNOqS4iax
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) October 11, 2020
पहिल्या फेरीपासून नदालचे सामन्यावर वर्चस्व
राफेल नदालने फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात 13 वेळा प्रवेश केला आहे. आजच्या सामन्यात नदालची लढत अग्रस्थानी असलेल्या नोवाक जोकोविच याच्या विरुद्ध होती. नदालने जोकोविचवर पहिल्या फेरीपासून वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये नदालने जोकोविचची सर्व्हिस 3 वेळा ब्रेक केली. पहिला सेट नदालने 6-0 असा निर्विवाद जिंकला. दुसरा सेट नदालनं 6-2 असा जिंकला.
फ्रेंच ओपन में नडाल ने रचा इतिहास, 20वां ग्रैंड स्लेम जीत की फेडरर की बराबरी#RolandGarros | #RafaelNadal | #NovakDjokovic | #RogerFederer | #FrenchOpen2020 pic.twitter.com/SkNOqS4iax
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) October 11, 2020
तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचची कडवी झुंज
तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं नदालला कडवी झुंज दिली. जोकोविचचनं नदालची सर्व्हिस ब्रेक केली. मात्र, फार्ममध्ये असणाऱ्या नदालनं देखील जोकोविचची सर्व्हिस ब्रेक केली. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 5-5 अशा बरोबरीवर होते. यानंतर जोकोविचच्या चुकांमुळे नदालनं निर्णायक आघाडी घेत सेट 7-5 असा नावावर केला. या सेट सोबत नदालनं 13 व्या वेळी फ्रेंच ओपन पुरुष गटात विजेतेपद मिळवलं. नदाल आणि जोकोविच यांच्यात सामना 2 तास 41 मिनिटं चालला.
राफेल नदालनं पहिल्यांदा 2005 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2009, 2015 आणि 2016चा अपवाद वगळता सर्व वर्षातील फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष गटातील विजेतेपद नदालने त्याच्या नावावर केले आहे.
संबंधित बातम्या:
टेनिस चाहत्यांसाठी खुशखबर, US Open 2020 होणार
Novak Djokovic | टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचला कोरोना, पत्नीही पॉझिटिव्ह
(Nadal beats Djokovic to win 13th French Open)