Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?

भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये एक नाही दोन नाही तर सलग तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा एक जादूगार म्हणजेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद...

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 3:43 PM

मुंबई : कोणताही खेळ किंवा कोणतंही क्षेत्र म्हटलं की त्यात काही दिग्गज असतात. मग त्यांचं नावच जणू त्या क्षेत्रातील सर्वोच्चतेचं परिमाण होतं. जसंकी, क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर, फुटबॉल म्हटलं की मॅराडोना अशा दिग्गजांच्या नावाने त्या खेळाची ओळखही होऊ लागते. जर याच सर्वोच्च परिमाणाचा हॉकी विश्वात विचार केला तर नाव समोर येतं ते म्हणजे भारताचे दिग्गज माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद… 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचा आज मोठा सन्मान भारत सरकारने केला आहे. खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, अशी माहिती नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली.

मेजर ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद (आता प्रयागराज) जिल्ह्यात 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. राजपूत कुटुंबातील ध्यानचंद हे पुढे जाऊन भारतीय हॉकीच नाही, तर जागतिक हॉकीमधील महान खेळाडू बनतील हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं. ध्यानचंद यांचे वडिल समेश्वर सिंह हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये होते. सैन्यात असल्याने सतत वडिलांची बदली होत असल्याने ध्यानचंद सहावीपर्यंतच शिकू शकले. वडिल ब्रिटीश आर्मीच्या हॉकी संघात असल्याने ध्यानचंद यांच्या रक्तातच हॉकी दडली होती. लहानपणी तितकसं हॉकीत लक्ष न देणाऱ्या ध्यानचंद यांनी 16 वर्षाचे असताना आर्मी जॉईन केली आणि बघता बघता त्यांचा हॉकीबद्दलची आवडही वाढू लागली.

असं पडलं ‘ध्यानचंद’ नाव

ध्यानचंद यांच्या नावामागे देखील एक किस्सा आहे. 16 वर्षाचे असतानाच आर्मी जॉईन केल्याने ध्यानचंद यांना दिवसा हॉकी सरावासाठी वेळ मिळत नसे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ते हॉकीचा सराव करत. त्यावेळी लाईट नसल्याने त्यांना चंद्राच्या प्रकाशात सराव करावा लागत. ज्यामुळे मित्र मस्तीत त्यांना ‘चंद’ बोलवू लागले. ज्यानंतर त्याचं नावच ध्यानचंद पडलं. सुरुवातीला आर्मीसाठी हॉकी खेळणारे ध्यानचंद 1922 ते 1926 पर्यंत आर्मीच्या संघातच खेळत होते. पण उत्कृष्ट खेळ आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आर्मी संघापर्यंतच मर्यादीत न राहता राष्ट्रीय संघातही प्रवेश मिळवला. त्यांनी ब्रिटीश इंडियाची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर असताना संघातून खेळायला सुरुवात केली. त्यावेळी चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्यांना सैन्यातील पदावरही बढती मिळाली.

पहिलं ऑलिम्पिक, पहिला सामना आणि ध्यानचंद यांची जादू

1928 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक सामना खेळणारे मेजर ध्यानचंद यांनी अशी काही जादू केली की संपर्ण जग त्यांच्या खेळाचे चाहते झाले. पहिल्याच सामन्यात त्यांनी 3 गोल लगावले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एकच गोल करणाऱ्या ध्यानचंद यांनी तिसऱ्या सामन्यात मात्र डेन्मार्क विरुद्ध  3 गोल करत संघाला विजय मिळवून दिला. नेदरलँडमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 5 सामन्यात सर्वाधिक 14 गोल केले.

हिटलरही होता ध्यानचंद यांच्या खेळाचा चाहता

1936 मध्ये बर्लिन येथे ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भारत आणि जर्मनी हे संघ आमने-सामने असताना तब्बल 40 हज़ार प्रेक्षकांसह जर्मनीचा हुकमशहा अॅडॉल्फ हिटलर देखील त्याठिकाणी होता. पहिल्या हाफमध्ये भारत केवळ एकच गोल करु शकला होता. पण नंतर ध्यानचंद यांनी असं काही केलं की संपूर्ण मैदान आश्चर्यचकीत झालं. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी थेट शूज काढून विनाशूज खेळू लागले. ज्यानंतर मात्र भारताने सामना तब्बल 8-1 अशा तगड्या फरकानं जिंकला. त्यांच्या या खेळीचा हिटलरही दिवाना झाला. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफरही दिली, पण मनात भारत असणाऱ्या ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली.

म्हणून म्हटलं जात ‘हॉकीचा जादूगर’

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगर म्हटलं जात… पण त्यांना ही उपमा सहज मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत आणि अप्रतिम खेळाचं दर्शन घडवलं. त्यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकवून दिलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 400 हून अधिक गोल केले. बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरची ऑलम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या ध्यानचंद यांनी त्यांच्या या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मिळून 39 गोल केले होते. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं होतं.

हे ही वाचा :

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

Tokyo Olympics 2021 | भारतीय महिला हॉकी संघाचा स्वप्नभंग, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक हुकलं

'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा
'आता टोकाला जाईपर्यंत संघर्ष', हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आरपारचा इशारा.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.