Asia Cup 2022 : नसीम शाहच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचा विजय, बाबर आजम खूश
ज्यावेळी सामन्यातील अंतिम षटके सुरु होती. त्यावेळी ड्रेसिंग रुममधील वातावरण अधिक तणावाचं होतं.
दुबईच्या (Dubai) शारजा मैदानात काल प्रेक्षकांना रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. अटीतटीच्या लढतीत नेमका कुणाचा विजय होणार असं अंतिम षटकापर्यंत वाटत होतं. पण पाकिस्तानचा फलंदाज नसीम शाह (Nazeem Shah) याच्या उत्तम कामगिरीमुळे बाबर आझम अधिक खुश झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम ओव्हरमध्ये शाहने सलग दोन षटकार खेचल्याने पाकिस्तानचा संघ विजयी झाला. त्यानंतर बाबर आझमला (Babar Azam) पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू जावेद मियादादची आठवण झाली आहे.
सामना अफगाणिस्तान जिंकेल असं सगळ्यांना वाटतं होतं
शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तान संघाला 11 धावांची गरज होती. त्यावेळी पाकिस्तानकडे फक्त एक खेळाडू बाकी होता. सामना अफगाणिस्तान जिंकेल असं सगळ्यांना वाटतं होतं. परंतु शाहने शेवटच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचले आणि पाकिस्तानचा संघ विजयी झाला.
नजीम खानने ज्या पद्धतीने मॅच जिंकली…
ज्यावेळी सामन्यातील अंतिम षटके सुरु होती. त्यावेळी ड्रेसिंग रुममधील वातावरण अधिक तणावाचं होतं. मागच्या काही सामन्याप्रमाणे कालच्या सामन्यात आम्हाला अधिक धावा करता न आल्याने सगळे चिंतेत होते. नजीम खानने ज्या पद्धतीने मॅच जिंकली त्यानंतर आनंदाचं वातावरण तयार झालं असं बाबर आझमने सांगितले.
त्यामुळे मला जावेद मियादादची आठवण…
1986 मध्ये ज्यावेळी जावेद मियादादने भारता विरुद्धच्या सामन्यात षटकार लावले होते. त्याचपद्धतीने कालच्या सामन्यात नसीम खानने षटकार लावले, त्यामुळे मला जावेद मियादादची आठवण झाली असं बाबर आझमने सांगितले.