Naseem Shah: PAK बॉलर नसीम शाहवर भारतीय एक्ट्रेस फिदा, जगजाहीर केली ‘दिल की बात’
काल भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेला हीने सुद्धा नसीम शाहची स्टोरी इंन्स्टाग्रामला शेअर केली होती. त्यामुळे तिची सुद्धा अधिक चर्चा सोशल मीडियावर होती.
आशिया चषकात (Asia Cup 2022) आत्तापर्यंतच्या सामन्यात खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. तसेच दुबईत (Dubai) सुरु असलेले सामने प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु आहेत. नसीम शाह या पाकिस्तानच्या गोलंदाजाची अधिक चर्चा आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध अटीतटीचा सामना सुरु असताना अंतिम षटकात दोन षटकार लगावले. सोशल मिडीयावर (Social Media) त्याचा चाहतावर्ग अधिक वाढला आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव आता अनेक अभिनेत्रींशी जोडलं जात आहे.
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती पाकिस्तान गोलंदाज नसीम शाहची सोशल मीडियावर अधिक तारिफ केली आहे. त्यामुळे तिची सुध्दा अधिक चर्चा सुरु आहे. जेव्हा शाह याने चांगली कामगिरी केली आहे, तेव्हापासून तो अधिक चर्चेत आहे.
सुरभी ज्योतीने सोशल मीडियावर लिहिलेल्या आशयात पाकिस्तानला एक चांगला हिरा सापडल्याचं म्हटलं आहे, आशिया चषकात काही सामने अधिक रोमांचक झाले आहेत.
सुरभी मागच्या काही दिवसांपासून तिच्या सिरिअरच्या रोलमध्ये चांगली चर्चेत आहे. सध्या ती नागिन या सिरिअलमध्ये काम करीत आहे. पूर्वी ती दोन चांगल्या सिरिअरमध्ये दिसली होती.
विशेष म्हणजे सुरभी ज्योतीने बॉलीवूडच्या एका चित्रपटात देखील काम केले होते. त्यावेळी तिची अधिक चर्चा नव्हती. क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है असं त्या चित्रपटाचं नाव होतं.
काल भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेला हीने सुद्धा नसीम शाहची स्टोरी इंन्स्टाग्रामला शेअर केली होती. त्यामुळे तिची सुद्धा अधिक चर्चा सोशल मीडियावर होती.