Navdeep Saini IPL 2021 RCB Team Player : पुन्हा एकदा आयपीएल गाजवण्यासाठी नवदीप सैनी सज्ज
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातील जलदगती गोलंदाज नवदीप सैनीने टीम इंडियाचं तिकीट मिळवलं.
मुंबई : आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (Royal Challengers Bangalore) संघातील जलदगती गोलंदाज नवदीप सैनीने टीम इंडियाचं तिकीट मिळवलं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी न केल्यामुळे, तसेच पुरेशी संधी न मिळाल्याने सैनीचं भारतीय संघातील स्थान पक्क झालेलं नाही. 2019 मध्ये त्याने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये त्याने कसोटी संघात पदार्पण केलं. आतापर्यंत त्याला ज्या काही संधी मिळाल्या, त्यात त्याने अद्याप मोठी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याचा मनसुबा सैनीने आखलेला असणार हे नक्की.
नवदीप सैनीची आंतराष्ट्रीय कारकीर्द
नवदीप सैनीने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये 4 बळी मिळवले आहेत. तर 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 6 बळी मिळवले आहेत. आतापर्यंत 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहेत. त्यात त्याने 13 बळी मिळवले आहेत. 17 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
चेंडू
|
निर्धाव
षटकं
|
धावा
|
विकेट्स
|
सर्वोत्तम
कामगिरी
|
इकोनॉमी
|
सरासरी
|
स्ट्राईक
रेट
|
4W
|
5W
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2021–
|
2
|
4
|
251
|
5
|
172
|
4
|
2/54
|
4.11
|
43.0
|
62.8
|
0
|
0
|
एकदिवसीय
2019–
|
7
|
7
|
390
|
0
|
454
|
6
|
2/58
|
6.98
|
75.7
|
65.0
|
0
|
0
|
टी-20
2019–20
|
10
|
9
|
197
|
1
|
235
|
13
|
3/17
|
7.15
|
18.1
|
15.2
|
0
|
0
|
नवदीप सैनीची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी
नवदीप सैनीने आतापर्यंत 48 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 132 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. 32 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 54 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 81 विकेट्स मिळवल्या आहेत. 46 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच 58 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 49 बळी मिळवले आहेत. 17 धावात 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सैनीची आयपीएलमधील कामगिरी
सामने | चेंडू | धावा | विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी | सरासरी | इकोनॉमी | स्ट्राईक रेट | 4W | 5W | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कारकीर्द | 26 | 562 | 776 | 17 | 2/24 | 45.64 | 8.28 | 33.05 | 0 | 0 |
2020 | 13 | 274 | 379 | 6 | 2/25 | 63.16 | 8.29 | 45.66 | 0 | 0 |
2019 | 13 | 288 | 397 | 11 | 2/24 | 36.09 | 8.27 | 26.18 | 0 | 0 |
संबंधित बातम्या
Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
(Navdeep Saini IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)