संपूर्ण कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्धच खेळला, ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूचा टीम इंडिया विरुद्ध तगडा रेकॉर्ड

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

संपूर्ण कसोटी कारकिर्दीत भारताविरुद्धच खेळला, 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूचा टीम इंडिया विरुद्ध तगडा रेकॉर्ड
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते.
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 12:13 PM

इस्लामाबाद : टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) एकमेकांचा कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी. गेल्या काही वर्षांमध्ये उभय संघात ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे क्रिकेट सामना खेळवण्यात आला नाहीये. पण या दोन्ही संघातील सामना हा क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी असते. या दोन्ही संघातील सामना म्हणजे क्रिकेट, मनोरंजन, हायव्होल्टेज ड्रामा आणि हमरीतुमरी असं कम्पलिट पॅकेज. थोडक्यात काय तर पैसावसूल मॅच. (nazar mohammad becomes first pakistani batsaman who scored hundred against team india)

या सामन्यात दोन्ही टीममधील खेळाडूंवर वर्ल्ड कप फायनल मॅचपेक्षा अधिक दबाव असतो. उभय संघातील सामन्यात दोघांपैकी कोणत्याही संघातील खेळाडूने विक्रम केल्यास त्या गोटात आनंदाच वातावरण असतं. तर दुसऱ्या गोटात नाराजी असते. तर काही खेळाडू अशी रेकॉर्ड कामगिरी करतात की त्याच्या नावावर कधीही ब्रेक न होणाऱ्या रेकॉर्डची नोंद होते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी फंलदाज नजर मोहम्मदने (Nazar Mohammad) टीम इंडिया विरुद्ध असाच किर्तीमान केला होता. नजर मोहम्मद यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांनी टीम इंडिया विरुद्ध केला हा किर्तीमान जाणून घेणार आहोत.

नजर यांचा जन्म आजच्याच दिवशी 5 मार्च 1921 रोजी पाकिस्तानात झाला. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले. विशेष म्हणजे हे 5 सामने टीम इंडिया विरुद्ध एकाच सीरिजमध्ये खेळले होते. या मालिकेचे आयोजन 1952-53 मध्ये करण्यात आले होते. उभय संघातील ही पहिलीच मालिका होती. या मालिकेतील लखनऊ कसोटीत नजर यांनी नाबाद 124 धावांची शतकी खेळी केली. पाकिस्तानकडून केलेलं हे पहिलं वहिलं शतक होतं. त्यामुळे नजर हे पाकिस्तानकडून शतक लगावणारे पहिले फलंदाज ठरले.

पाकिस्तानचा डाव आणि 43 धावांनी विजय

या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियावर एक डाव आणि 43 धावांनी मात केली होती. भारताने पहिल्या डावात 106 धावा केल्या. तर पाकिस्तानने 331 धावा केल्या. दुसऱ्या डावातही भारताला विशेष काही करता आले नाही. टीम इंडियाच डाव 182 धावांवर आटोपला.

नजर मोहम्मदची कारकिर्द

नजर मोहम्मद यांनी आपल्या 5 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 39.57 सरासरीने 277 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 1 शतक आणि 1 अर्धशतक लगावलं. या व्यतिरिक्त 45 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 41.50 च्या सरासरीने 8 शतक आणि 9 अर्धशतकांसह 2 हजार 739 धावा केल्या. फर्स्‍ट क्‍लासमधील 175 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. नजर मोहम्‍मद यांचा मुलगा मुदस्‍सर नजर यानेही पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुदस्‍सरने पाकसाठी 76 कसोटींमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

संबंधित बातम्या :

आयपीएलमध्ये KKR ला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देणारा स्टार खेळाडू आता ‘या’ स्पर्धेत खेळणार

पोलार्डचे खणखणीत 6 षटकार, ‘सिक्सर किंग’ युवराजची प्रतिक्रिया, म्हणाला…..

(nazar mohammad becomes first pakistani batsaman who scored hundred against team india)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.