Love Story: अवघ्या 15 मिनिटात आशिष नेहरानं ठरवलं लग्न, रुश्माला विवाहाबाबत विचारताच म्हणाली…
आशिष नेहरा आणि रुश्मा यांची लव्हस्टोरीबाबत चाहत्यांना कायमच उत्सुकता राहिली आहे. ओव्हलमधील एका भेटीनेच नेहरा रुश्माच्या प्रेमात पडला होता. मित्रांसोबत बसलेला असताना अवघ्या 15 मिनिटात लग्नाबाबत त्याने ठरवलं होतं.
मुंबई- आशिष नेहरा भारतीय क्रिकेट जगातील सर्वश्रूत नाव आहे. मैदानात, ड्रेसिंग रुम असो की सोशल मीडिया सर्वकडे आशिष नेहरा नाव चर्चेत राहिलं आहे. आपल्या बोलक्या स्वभामामुळे त्याने ड्रेसिंगरुममधील प्रत्येक खेळाडूंची मनं जिंकली आहेत. इतर क्रिकेटपटूप्रमाणे आशिष नेहराची लव्हस्टोरी काही वेगळी नाही. आशिष नेहराचं लग्न आर्टिस्ट रुश्मासोबत झाल आहे. 2002 इंग्लंड दौऱ्यावर असताना रुश्मा सामना पाहण्यासाठी ओव्हल मैदानात गेली होती. या सामन्यादरम्यान आशिष नेहरा रुश्माला आपलसं केलं. यानंतर दोघांमध्ये मैत्री फुलत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आशिष नेहराने आपल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. 2 एप्रिल 2009 रोजी दोघं लग्न बंधनात अडकले. पण मित्रांसोबत असताना त्या 15 मिनिटात नेमकं काय झालं? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर खुद्द आशिष नेहराने एका मुलाखतीत दिलं.
मित्रांसोबत नेमकं काय झालं होतं?
23 मार्च 2009 रोजी आशिष नेहरा आपल्या मित्रांसोबत बसला होता. तेव्हा त्याच्या मनात लग्नाबाबत विचार आला. आशिष नेहराने तात्काळ रुश्माला फोन केला आणि लग्नाबाबत विचारणा केली. पण तिला वाटलं की आशिष मस्ती करत असल्याने तिने उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशीही आशिषने पुन्हा हाच प्रश्न रुश्माला विचारला असता तिचा विश्वास बसला. तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. आशिष नेहराने याबाबतचा खुलासा एका मुलाखतीत केला होता की, 15 मिनिटात मी लग्न करण्याचं ठरवलं आणि एका आठवड्यात लग्न केलं. 26 मार्च रोजी रुश्मा आपल्या आईसोबत दिल्लीला आली आणि दोघांनी 2 एप्रिल 2009 रोजी लग्न केलं.
आशिष नेहराची क्रिकेट कारकिर्द
आशिष नेहराने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या आशिष नेहराने 17 कसोटी, 120 वनडे आमि 27 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. आशिष नेहराने कसोटीत 44, वनडेत 157 आणि टी 20 मध्ये 34 गडी बाद केले आहेत. आशिष नेहरा 2011 विश्वचषक विजेता संघात होता. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. मात्र दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. आयपीएल स्पर्धेत आशिष नेहरा गुजरात टाइटन्स संघाचा हेड कोच आहे. नेहराने आखलेल्या रणनितीमुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला 2022 स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरता आलं होतं.