भारताची फुलराणी सायना नेहवालच्या टि्वटला रिप्लाय देताना रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थने मर्यादा सोडून अत्यंत वादग्रस्त टि्वट केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने सायनाच्या टि्वटला दिलेला रिप्लाय पाहून नेटीझन्स भडकले आहेत.
पाच जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये चूक झाली होती. त्यावरुन सायनाने एक टि्वट केलं होतं. काही आंदोलकांनी मार्ग रोखून धरला होता. त्यामुळे मोदींचा सुरक्षा ताफा 15 ते 20 मिनिटं पुलावर अडकून पडला.
सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याने पंतप्रधानांचा पुढचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यावरुन बराच वाद झाला होता.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे समजल्यानंतर सायनाने एक टि्वट केले.
"स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर कुठलाही देश आपण सुरक्षित आहोत, असा दावा करु शकत नाही. मी कठोर शब्दात या घटनेचा निषेध करते" असे सायनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले होते.
सिद्धार्थने सायनाच्या या टि्वटला लैंगिकअंगाने जाणारा अत्यंत घाणेरडा रिप्लाय दिला. त्यामुळे नेटीझन्स त्याच्यावर भडकले आहेत.
अनेकांनी सिद्धार्थला स्त्रीद्वेषी ठरवलं आहे.
देशाला गौरव प्राप्त करुन देणाऱ्या महिलेबद्दल सिद्धार्थचे हे वर्तन रस्त्यावरच्या छपरीसारख आहे. अशा नमुन्यांना आई-वडिल कसं मोठ करतात? त्याचं आश्चर्य वाटतं, असं एका युजरने म्हटलं आहे.
काही युजर्सनी त्याला फ्लॉप अभिनेता म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये रंग दे बसती चित्रपटामुळे त्याची ओळख आहे.