‘मी विचारही केला नव्हता, मला हे दिवस बघायला मिळतील’, स्मृती मंधानाचा मोठा खुलासा
"ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक असतं. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा एक उत्तम अनुभव ठरणार आहे", असं स्मृती मंधाना म्हणाली. (never thought of playing day night test match Smriti mandhana)
मुंबई : कसोटी क्रिकेटला नवा आयाम देण्यासाठी आणि मैदानावर अधिकाधिक प्रेक्षक यावेत म्हणून डे-नाईट फॉरमॅट आणला गेला. भारतीय महिला संघाला हा सामना खेळायला बरीच वाट पाहावी लागली, अखेर 2019 मध्ये कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुध्द भारतीय महिला संघाने (India Women Cricket Team) हा सामना खेळला. आता भारताचा महिला संघ डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियात पहिला डे-नाईट कसोटी सामना भारत खेळणार आहे. आपल्या संघाला डे-नाईट कसोटी सामना खेळण्याची संधी मिळेल असा मी कधी विचारही केला नव्हता, असं भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti mandhana) म्हणाली. (never thought of playing day night test match Smriti mandhana)
वाकावर भारत ऑस्ट्रेलिया डे नाईट सामना
भारतीय महिला संघ आगामीऑस्ट्रेलिया दौर्यावर येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान पर्थमधील वाका मैदानावर डे-नाईट कसोटी सामना खेळेल. या दौर्यावर संघाला मर्यादित षटकांची मालिकादेखील खेळायची आहे. याचविषयी मंधानाने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बातचित केली. ती म्हणते, “खरं सांगायचे तर जेव्हा मी पुरुषांची डे-नाईट टेस्ट पाहत होते तेव्हा मला हा क्षण अनुभवता येईल, असा माझ्या मनात कधीच विचारही आला नव्हता. यावेळी मी असे म्हणणं चुकीचं ठरेल पण भारतीय महिला संघ कधी डे नाईट कसोटी सामन्याचा अनुभव घेईल असं मला कधीच वाटलं नाही. जेव्हा याची घोषणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला.”
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
डे-नाईट टेस्टच्या रुपात 2006 नंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय महिला संघ कसोटी मॅच खेळल. त्याअगोदर इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे संघाला कसोटी सामना खेळायचा आहे. मंधाना म्हणाली, “मला माझे पहिले डे-नाईट वनडे आणि टी -२० सामनेही आठवतात. लहान मुलाप्रमाणे मी खूप उत्साही होते. मी विचार करत होते ‘व्वा, आम्ही डे-नाईट सामना खेळू शकेल’. यानिमित्ताने जुन्या आठवणी ताज्या झाल्या, असं मंधाना म्हणाली.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं आव्हानात्मक
“आता आम्ही डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहोत, यासाठी बर्याच गोष्टींवर काम करायचं आहे अशावेळी सगळ्यांमध्ये खूप उत्साह आहे. डे-नाईट टेस्ट मॅचचा आम्ही एक भाग आहोत, म्हणून सगळ्यांमध्येच उत्साह आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक असतं. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा एक उत्तम अनुभव ठरणार आहे.”
(never thought of playing day night test match Smriti mandhana)
हे ही वाचा :
जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी
Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?