New Zealand | न्यूझीलंडच्या तडाखेबाज अष्टपैलू खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
निवृत्तीनंतर या अष्टपैलू खेळाडूने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा (New Zealand Cricket) अष्टपैलू खेळाडू कॉरी एंडरसनने (Corey Anderson Retirment) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एंडरसन गेल्या 2 वर्षांच्या अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. निवृत्तीनंतर एंडरसनने अमेरिकेा टी 20 लीगमध्ये (AMERICA CRICKET) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर एंडरसन या अमेरिका टी 20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. New Zealand all-rounder Corey Anderson retires from international cricket
निवृत्तीनंतरची पहिली प्रतिक्रिया
“मी न्यूझीलंडसाठी प्रतिनिधित्व केलं ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. मला अजून क्रिकेट खेळायचं होतं. तसेच बरंच काही साध्य करायचे होतं. पण काहीवेळा असे घडते आणि विविध आव्हाने उद्भवतात आणि आपल्याला त्या दिशेने नेतात ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी कौतुक करतो ” अशी पहिली प्रतिक्रिया एंडरसनने निवृत्तीनंतर क्रिकबझला दिली. एंडरसनने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी खेळण्याचा निर्णयासोबतच 3 वर्षांचा करार केला असल्याची माहिती मिळते आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
एंडरसनला न्यूझीलंडकडून फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. एंडरसनने 49 एकदिवसीय, 30 टी 20 आणि 13 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार 109, टी 20 मध्ये 485 तर कसोटीध्ये 683 धावा केल्या आहेत. एंडरसन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना पाकिस्तानविरोधात 2 नोव्हेंबर 2018 ला खेळण्यात आला होता. हा टी 20 सामना होता.
न्यूझीलंडकडून वेगवान एकदिवसीय शतक
एंडरसनने न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक करण्याची कामगिरी केली आहे. एंडरसनने वेस्ट इंडिजविरोधात ही कामगिरी केली होती. एंडरसनने 1 जानेवारी 2014 मध्ये ही कामगिरी केली होती. एंडरसनने 36 चेंडूत वेगवान शतक लगावलं होतं. एंडरसनने या सामन्यात नाबाद 131 धावांची खेळी केली होती. वेगवान शतकांच्या बाबतीत पहिल्या क्रमाकांवर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हीलियर्सचा आहे.
दरम्यान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान सध्या या दोन्ही संघात कसोटी मालिका खेळण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार
New Zealand all-rounder Corey Anderson retires from international cricket