New Zealand vs Pakistan, 1st T20I : न्यूझीलंडचा पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय, पदार्पणात जेकब डफी चमकला

न्यूझीलंडने 3 टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

New Zealand vs Pakistan, 1st T20I : न्यूझीलंडचा पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय, पदार्पणात जेकब डफी चमकला
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 5:53 PM

ऑकलंड : न्यूझीलंडने पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तानवर (New Zealand vs Pakistan T 20) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. यासह न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून 7 चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून टीम सायफेर्टने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. New Zealand Beat Pakistan By 5 Wickets in 1st T 20I in eden park

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडने झटपट 2 विकेट्स गमावले. मार्टिन गुप्टील 6 तर डेव्हन कॉनवे 5 धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडची 21-2 अशी स्थिती झाली. यानंतर टीम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सने तिसऱ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. यानंतर फिलीप्स 23 धावांवर बाद झाला. यानंतर पुन्हा चौथ्या विकेटसाठी सायफर्ट आणि मार्क चॅपमॅनने 45 धावांची भागीदारी केली. या दरम्यान सायफर्टने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर त्याला मैदानात फार वेळ टिकता आले नाही. सायफर्टला शाहीन आफ्रिदीने 57 धावांवर बाद केलं. सायफर्टने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 57 धावांची खेळी केली.

सायफर्टनंतर काही वेळाने चॅपमॅनही बाद झाला. चॅपमॅनने 20 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्ससह शानगदार 34 धावा चोपल्या. यानंतर जेम्स निशाम आणि मिचेल सॅंटनर या जोडीने न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं. निशाम आणि सॅंटनरने प्रत्येकी नाबाद 15 आणि 12 धावा केल्या. पाकिस्तानकडून रौफने सर्वाधिक 3 तर शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार शादाब खानने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर फहिम अश्रफने 31 धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर स्कॉट कुगेलेइजनने 3 विकेट्स घेत डफीला चांगली साथ दिली.

पदार्पणातील सामन्यात डफीची शानदार कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण संस्मरणीय रहावं, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. जेकब डफीला न्यूझीलंडकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या पदार्पणातील सामन्यात डफीने शानदार कामगिरी केली. डफीने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 33 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या.

दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना रविवारी 20 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक असणार आहे. यामुळे पाकिस्तानसाठी दुसरा टी 20 सामना हा ‘करो या मरो’चा असणार आहे.

संबंधित बातम्या :

NZ vs PAK: न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिकेआधी पाकिस्तानला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे सीरिजबाहेर

New Zealand Beat Pakistan By 5 Wickets in 1st T 20I in eden park

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.