माउंट माउनगुई : न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 72 धावांनी शानदार (West Indies vs New Zealand 2 nd T 20)विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने टी 20 मालिकाही जिंकली आहे. न्यूझीलंडने 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी 239 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र वेस्ट इंडिजला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. विडिंजकडून कर्णधार कायरन पोलार्डने सर्वाधिक 28 धावा केल्या. तर किमो पॉलने नाबाद 26 धावा केल्या. न्यूझीलंडकडून काइल जेमीन्सन आणि मिचेल सॅंटनरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. New Zealand Beat West Indies by 72 runs in 2nd T 20
Flying to a series win! That's it from Bay Oval. A 72 run win to take the KFC T20 Series v @windiescricket with one game remaining tomorrow also at Bay Oval. Glenn Phillips 108, Devon Conway 65. Jamieson and Santner each with 2 wickets. Scorecard | https://t.co/ig6dG1ud7q #NZvWI pic.twitter.com/qhcxVfXale
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2020
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या विंडिजची खराब सुरुवात राहिली. विंडिजने पहिली विकेट 10 धावांवर गमावली. सलामीवीर ब्रॅंडन किंगला काइल जेमीन्सनने शून्यावर बोल्ड केलं. न्यूझीलंडने विंडिजला सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने धक्के द्यायला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर विंडिंजच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. ब्रॅंडनचा अपवाद वगळता विंडिजच्या इतर सर्व फलंदाजांना योग्य सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही.
A tough ? to swallow ?
WI will bounce back!?#WIvNZ #TeamWI pic.twitter.com/zOQjEGsjPe
— Windies Cricket (@windiescricket) November 29, 2020
सलामीवीर आंद्रे फ्लेटचर 20 धावांवर खेळत होता. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. काइल मेयर्सही 20 धावांवर कॅचआऊट झाला. निकोलस पूरन 7 धावा करुन माघारी परतला. कर्णधार कायरन पोलार्डला चांगली सुरुवात मिळाली. मात्र पोलार्डही 28 धावावंर असताना कॅचआऊट झाला. पोलार्डने 15 चेंडूत 4 सिक्सच्या मदतीने 28 धावा केल्या.
शिमरॉन हेटमायरकडून सर्वांना आशा होत्या. मात्र हेटमायरनेही आपली विकेट गमावली. हेटमायरने 32 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. रोवमॅन पॉवेलन 9 धावा केल्या. फॅबियन अॅलेन 15 धावांवर तंबूत परतला. शेलडॉन कॉट्रेलने 1 धाव काढली. न्यूझीलंडकडून काइल जेमीन्सन आणि मिचेल सॅंटनरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार टीम साऊथी, लॉकी फॅर्ग्युसन, इश सोढी आणि जेम्स निशाम या चौकडीन प्रत्येकी 1 विकेट मिळवला.
त्याआधी वेस्ट इंडिजने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडले. न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या शतकी आणि डेव्हन कॉन्वेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. ग्लेनने 51 चेंडूत 10 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 108 धावा केल्या. तर कॉन्वेने 37 चेंडूत 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओशाने थॉमस, फॅबियन अॅलन आणि कर्णधार कायरन पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
दरम्यान या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना 30 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. विडिंजचा हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. तर तिसऱ्या सामन्यातही पराभव करुन 3-0 असा विजय मिळवण्याचा मानस न्यूझीलंडचा असेल.
न्यूझीलंड संघ : टिम साऊथी (कर्णधार) मार्टिन गुप्टिल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, रॉस टेलर, जेम्स नीशम, मिशेल सॅंटनर, ईश सोधी, काईल जेमीसन आणि लॉकी फर्ग्युसन
वेस्ट इंडिज टीम : कायरॉन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे फ्लेचर, ब्रॅंडन किंग, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, फॅबियन अॅलन, किमो पॉल, काइल मेयर्स, ओशाने थॉमस आणि शेल्डन कॉट्रेल
संबंधित बातम्या :
Ind vs Aus 2020, 2nd ODI Live Score Updates | स्टीव्ह स्मिथचे दमदार अर्धशतक
New Zealand Beat West Indies by 72 runs in 2nd T 20