Kane Williamson | मुलगी झाली हो ! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला कन्यारत्न

केनने इंस्टाग्रामवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Kane Williamson | मुलगी झाली हो ! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला कन्यारत्न
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 3:36 PM

ऑकलंड : न्यूझीलंडचा क्रिकेट टीमचा (New Zealand Cricket Team) कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson ) बाबा झाला आहे. केनला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. केनची पत्नी सारा रहीम हीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. केनने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवरुन दिली आहे. केनने त्याच्या मुलीला मिठीत घेतलेला फोटो इंस्टावर शेअर केला आहे. केनने ही गोड बातमी दिल्याने त्याला सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. केनला आयसीसी आणि आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद या टीमने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. new zealand captain kane williamson became father announcement via instagram

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान केन मायदेशी परतला होता. पहिल्या कसोटी सामन्यात केनने दुहेरी शतक झळकावलं होतं. यानंतर केनने घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचा सन्मान करत न्यूझीलंड टीम मॅनेजमेंटने केनला घरी जाण्याची परवानगी दिली. विल्यमसन दुसरा कसोटी सामना खेळला नाही. दुहेरी शतक झळकल्यानंतरच विल्यमसनने तो वडील होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच मी उत्सुक असल्याचं, केन म्हणाला होता.

केनची पत्नी सारा रहीम

केनची पत्नी सारा रहीम ही परिचारिका (नर्स) आहे. केन हा उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. तेव्हा पहिल्यांदा हे दोघे भेटले होते. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

दरम्यान 18 डिसेंबरपासून न्यूझीलंड  पाकिस्तानविरोधात टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. केन पाकिस्तानविरोधातील शेवटच्या 2 टी 20 सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 18 डिसेंबर

दुसरा सामना – 20 डिसेंबर

तिसरा सामना – 22 डिसेंबर

पहिल्या टी 20 सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), टॉड एस्ले, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवन कॉन्वे, जॅकब डफी, मार्टिन गुप्टील, स्कॉट कुगलेजिन, जिम्मी निशाम, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि ब्लेयर टिकनेर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड एस्ले, ट्रेन्ट बोल्ट, डेवन कॉन्वे, मार्टिन गुप्टील, काइल जेमिसन, स्कॉट कुगलेजिन, डार्ली मिशेल, जिम्मी निशम, ग्लेन फिलिप्स, टीम सेइफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि टीम साउथी.

संबंधित बातम्या :

NZ vs PAK: पाकिस्तानविरोधातील टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन

new zealand captain kane williamson became father announcement via instagram

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.