T20 World Cup 2022: पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडची अवस्था बिकट, 6 ओव्हरमध्ये दोन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये
शाहीन आफ्रिदीने भेदक गोलंदाजी करीत पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली आहे.
सीडनी : सीडनीच्या (Sydney) मैदानात पाकिस्तान (pakistan) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात महामुकाबला सुरु आहे. न्यूझिलंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे न्यूझिलंड टीमच्या सहा ओव्हरमध्ये 40 धावा झाल्या आहेत. फिन एलेन, डेवन कॉन्वे हे दोन फलंदाज बाद झाले आहेत. त्यामुळे या पुढचे फलंदाज कशी खेळी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
शाहीन आफ्रिदीने भेदक गोलंदाजी करीत पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली आहे. तर शादाब खानने एकाला धावचित केले आहे. सीडनीच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे.
पाकिस्तानची प्लेइंग इलेवन- मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन- फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट