IPL 2021 : यंदाचा आयपीएल करंडक कोण जिंकणार, तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स कुणाचा? दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) यंदाच्या आयपीएलचा करंडक कोण जिंकणार तसंच गुणतालिकेत सर्वांत तळाशी कोण असणार, याविषयीची मोठी भविष्यवाणी केली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या मोसमाचा रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही दिवस राहिलेच. सगळ्या संघांची जोरदार तयारी सुरु आहे. कुणाचे ट्रेनिंग कॅम्प तर कुणाची प्रतिस्पर्धी संघांना मात देण्याची रणनिती… अशातच न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) यंदाच्या आयपीएलचा करंडक कोण जिंकणार तसंच गुणतालिकेत सर्वांत तळाशी कोण असणार, याविषयीची मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीने सगळ्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. (New Zealand Player Scott Styris Prediction IPL 2021 MI CSK RCB DC)
मुंबईकडे पुन्हा एकदा जेतेपद
स्कॉट स्टायरिसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या वर्षीही विजेतेपद बहाल केलं आहे. मुंबईचा संघ पाहता त्यांना हरवणं इतर संघांना कठीण जाईल, असं अनुमान लावत मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2021 चा करंडक जिंकेन, अशी मोठी भविष्यवाणी स्कॉटने केली आहे.
गुणतालिकेत चेन्नई तळाशी राहणार
पाठीमागच्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा परफॉर्मन्स खराब झाला. अगदी बाद फेरीत पोहोचायच्या अगोदर चेन्नईची टीम गारद झाली. यंदाच्या वर्षीही चेन्नईची हीच परिस्थिती कायम राहिल. चेन्नईची टीम गुणतालिकेत सगळ्यात तळाशी राहिल, असा अंदाज स्कॉट स्टायरिसने लावला आहे.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर कोण?
आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरला रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स, तिसऱ्या क्रमाकांवर के.एल.राहुलची पंजाब टीम तर चौथ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबाद राहील. पाचव्या क्रमांकावर विराटची रॉयल्स चॅलेंज हैदराबाद असेल, तर सहाव्या क्रमाकांवर राजस्थान रॉयल्स राहिल,असा अंदाज स्क़ॉटने व्यक्त केला आहे.
स्कॉट स्टायरिसने केलेलं ट्विट-
Let’s try this
WAY TOO EARLY POWER RANKINGS @IPL 2021
1- @mipaltan 2- @DelhiCapitals 3- @PunjabKingsIPL (auction?) 4- @SunRisers 5- @RCBTweets 6- @rajasthanroyals (Morris fitness/archer back quickly.Maybe ⬆️) 7- @KKRiders (batting worries) 8- @ChennaiIPL
Thoughts
— Scott Styris (@scottbstyris) April 2, 2021
प्रतिक्षा पहिल्या सामन्याची…
इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.
(New Zealand Player Scott Styris Prediction IPL 2021 MI CSK RCB DC)
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!