SL vs NZ | न्यूझीलँडचं जबरदस्त कमबॅक, WTC अंतिम फेरीचं भारताचं गणित दोन दिवसात सुटणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड असे दोन कसोटी सामने सुरु आहेत. दोन्ही सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोण बाजी मारतं? यावर सर्वकाही अवलंबून आहे.

SL vs NZ | न्यूझीलँडचं जबरदस्त कमबॅक, WTC अंतिम फेरीचं भारताचं गणित दोन दिवसात सुटणार
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉच्या दिशेने, WTC फायनलसाठी न्यूझीलँड लाज राखणारImage Credit source: New Zealand Twitter
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 1:12 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु असला तरी श्रीलंका न्यूझीलँड सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हे दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. कारण यावरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी भारत आणि श्रीलंका दोन संघात चुरस आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड हे दोन्ही सामने एकाच दिवशी सुरु झाले आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाला काय होतं? काय स्थिती याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहता भारत हा सामना जिंकेल असं वाटत नाही. भारताने चांगली फलंदाजी केली तर या खेळपट्टीवर तरी सामना ड्रॉ होईल असंच चित्र आहे. त्यामुळे मालिकेत 2-1 अशी स्थिती राहील. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर 2-2 अशी स्थिती होईल. त्यामुळे या दोन्ही स्थितीत श्रीलंका आणि न्यूझीलँड सामन्याकडे लक्ष असणार आहे.

न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका

न्यूझीलँड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दोन दिवसात मजबूत स्थितीत होती. पण न्यूझीलँड जोरदार कमबॅक केलं. पहिल्या डावात श्रीलंकेनं सर्वबाद 355 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात न्यूझीलँडने सर्वबाद 373 धावा केल्या आणि 18 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 3 बाद 83 धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलँडकडे सामना वर्चस्व मिळवण्याची संधी आहे.

भारत असा जाईल अंतिम फेरीत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा सामना ड्रॉ झाला, तर श्रीलंकेच्या स्थितीवर लक्ष असेल. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड सामना ड्रॉ झाला तर भारत अंतिम फेरीत जाईल. जर न्यूझीलँडने सामना जिंकला तरी भारतालाच संधी मिळेल. पण श्रीलंकेने सामना जिंकला तर मात्र न्यूझीलँडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर सर्वकाही अवलंबून असेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख

अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी श्रीलंका आणि भारतात सामना आहे. फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.