इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघात भारतीय खेळाडूची एन्ट्री, दोन नव्या चेहऱ्यांनाही संधी!
न्यूझीलंड संघाने जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. | New Zealand test team
नवी दिल्ली : न्यूझीलंड संघाने जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (New Zealand Vs England) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये तीन नवख्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. यापैकी एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेला डेव्हन कॉनवे. तो न्यूझीलंडकडून टी -20 आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यावेळी त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. डेव्हन कॉनवेसोबत भारतीय वंशाचा रचिन रवींद्र आणि वेगवान गोलंदाज जेकब डफी या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. (New Zealand test team England Devon Convay Jacob DUffy Rachin Ravindra)
मूळ भारतीय वंशाचा असलेला 21 वर्षीय रवींद्र डाव्या हाताने फलंदाजी करतो. रवींद्रने वयाच्या 18 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. लॉर्ड्स आणि एजबेस्टन येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यापैकी 15 खेळाडू साऊथ हॅम्पटन येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी एकत्र येणार आहे. हा सामना 18 जूनपासून सुरु होईल.
न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड म्हणाले, “रचिन रवींद्रकडे अंडर 19 पासूनच भविष्यातील एक उत्तम खेळाडू म्हणून पाहिलं गेलंय. ओपनिंगबरोबर तो मिडल ऑर्डरमध्ये देखील बॅटिंग करु शकतो. तसंच तो गरजेवेळी बोलिंगही टाकू शकतो. आपल्या बोलिंगची झलकही त्याने अनेक वेळा दाखवली आहे.”
पाकिस्तानविरुद्ध डफीचा परफॉर्मन्स
जेकब डफीने पाकिस्तानविरुद्ध टी -20 मालिकेत पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने 33 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला होता. प्रशिक्षक स्टडी म्हणाले, “देशांतर्गत क्रिकेटमध्ये जेकब चांगलं प्रदर्शन करतोय. बॉलला स्विंग करण्यामुळे इंग्लंडमध्ये त्याचा चांगला पर्याय आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केन विल्यमसन, फिरकीपटू मिशेल सेंटनर, वेगवान गोलंदाज काइल जेमीसन आणि ट्रेंट बोल्ट कदाचित खेळू शकणार नाहीत. हे सर्व लोक लोक आयपीएल खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत.
न्यूझीलंडच्या संघात समावेश कुणाचा?
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कोनवे, कोलिन डी ग्रैंडहोम, जेकब डफी, मॅट हेनरी, काइल जमेसन, टॉम लॅथम, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, टिम साउदी, रोस टेलर, नील वेगनर, बीजे वाटलिंग और विल यंग.
(New Zealand test team England Devon Convay Jacob Duffy Rachin Ravindra)
हे ही वाचा :