NZ vs ENG, 3rd Odi | तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा इंग्लंडवर शानदार विजय, आव्हानाचं पाठलाग करताना रेकॉर्ड पार्टनरशीप

न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि अमेलिया केरने चौथ्या विकेटसाठी 172 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

NZ vs ENG, 3rd Odi |  तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा इंग्लंडवर शानदार विजय, आव्हानाचं पाठलाग करताना रेकॉर्ड पार्टनरशीप
न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि अमेलिया केरने चौथ्या विकेटसाठी 172 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 2:08 PM

ऑकलंड | तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड महिला क्रिकेट (New Zealand Women team) टीमने इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत शेवट गोड केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने लाज राखली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान न्यूझीलंडने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. एमी सॅटरथवेट (Amy Satterthwaite) ही न्यूझीलंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. सॅटरथवेटने शानदार नाबाद शतकी खेळी केली. तर अमेलिया केरने (Amelia Kerr) नाबाद 72 धावा करत सॅटरथवेटला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून नताली सायव्हर, फ्रीया डेव्हिस आणि केट क्रॉसने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान इंग्लंडने याआधीचे 2 सामने जिंकले होते. यामुळे इंग्लंडने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. (New Zealand Women team beat England by 7 wicekts in 3rd odi)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडची निराशाजनक सुरुवात राहिली. न्यूझीलंडने ठराविक अंतराने 3 विकेट्स गमावले. यामुळे न्यूझीलंडची 51-3 अशी स्थिती झाली होती. पण यानंतर एमी सॅटरथवेट आणि अमेलिया केरने न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला.

चौथ्या विकेटसाठी 172 धावांची नाबाद विजयी रेकॉर्ड भागीदारी

न्यूझीलंडची 51 धावांवर 3 विकेट्स अशी अवस्था झाली होती. पण यानंतर सॅटरथवेट आणि अमेलिया केर या दोघांनी इंग्लंडवर हल्ला चढवला. सॅटरथवेटने 128 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. तर केरने 88 बोलमध्ये 7 फोरसह नॉट आऊट 72 धावांची खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेट्साठी चौकार षटकार खेचत 172 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. महिला क्रिकेटमध्ये विजयी आव्हानाचं पाठलाग करताना कोणत्याही विकेट्साठी केलेली ही रेकॉर्ड पार्टनरशीप ठरली.

इंग्लंडची बॅटिंग

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 47.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 220 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 221 धावांचे आव्हान मिळाले.

3 मार्चपासून टी 20 मालिका

दरम्यान उभयसंघात एकदिवसीय मालिकेनंतर आता टी 20 सीरिजचा थरार रंगणार आहे. या टी 20 मालिकेला 3 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला, धोनीच्या चेन्नईला चॅम्पियन बनवलं, आता ऑस्ट्रेलियात करतोय ड्रायव्हरची नोकरी

अश्विन, कुंबळे, हरभजन की कपिल देव, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर कोण?

6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार, मुंबईकर चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

(New Zealand Women team beat England by 7 wicekts in 3rd odi)

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...