World Women Boxing Championship : निखत जरीनचा “सूवर्ण पंच”, महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक

निखतने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत थायलंडच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला. निखतने पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच, या जागतिक चॅम्पियनशिप (IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022) च्या चालू स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बॉक्सर आहे.

World Women Boxing Championship : निखत जरीनचा सूवर्ण पंच, महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक
निखत जरीनचा "सूवर्ण पंच", महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:48 PM

मुंबई : भारतीय बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) गुरुवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (World Women Boxing Championship) अंतिम फेरीत थायलंडच्या (Thailand) जितपाँग जुटामासचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. निखतने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत थायलंडच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला. निखतने पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच, या जागतिक चॅम्पियनशिप (IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022) च्या चालू स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बॉक्सर आहे. यासह ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखतचे नाव एका खास यादीत समाविष्ट झाले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत ही भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे. सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहेत ज्यांनी जागतिक विजेतेपद पटकावले आहे. आता या यादीत हैदराबादची बॉक्सर निखतचेही नाव आले आहे.

घमासान टक्कर रंगली

निखतने मॅचची सुरुवात सावध पवित्रा घेत केली. ती थायलंडच्या खेळाडूपासून सावध अंतर राखत होती, मात्र त्यानंतर तिने पंचेस मारण्यास सुरुवात केली आणि थायलंडच्या बॉक्सरला घाम फोडला. दरम्यान रेफ्रींनी तिला दोनदा वॉर्निंगही दिली. निखतने येथून आक्रमक खेळाची चुणूक दाखवली. थायलंडच्या खेळाडूनेही हार न मानता चांगला बचाव करताना निखतला दूर ठेवले आणि संधी मिळताच पंचही मारले. उजव्या हाताने काही चांगले पंचेस सुरू असताना, त्याचवेळी निखतने डाव्या हाताने पंचेस मारण्याचा प्रयत्न केला. या फेरीत, निखतने आणखी 10 अचूक पंच केले आणि रेफ्रींनी तिला 10 गुण दिले तर थायलंडच्या खेळाडूला नो पॉइंट दिले गेले.

सर्व फेऱ्याअंती मोठा विजय

दुसऱ्या फेरीत थायलंडची बॉक्सर सुरुवातीपासूनच आक्रमक दिसली आणि तिने निखतवर जोरदार हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निखतने संयमाचा अवलंब करत प्रतिस्पर्ध्याच्या मुसक्या आवळल्या. या फेरीतही निखतने काही अचूक पंचेस केले, जरी निखतने पहिल्या राऊंडमध्ये ज्या प्रकारचे पंच मारले होते तसा खेळ केला नाही. फेरीच्या शेवटी थायलंडच्या बॉक्सरने चांगले पंच मारून गुण मिळवले, ही फेरी तिच्या नावे झाली. मात्र तीन राऊंच्या शेवटीही निखतच आघाडीवर असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. समोरच्या बॉक्सरचा यावेळी नाईलाज झाला. निखतच्या या कामगिरीने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.