‘अल्लाहशिवाय कोणीही नाही…’, PAK खेळाडूचे न्यूझीलंडच्या मशिदीत भाषण
विशेष म्हणजे व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून रिझवानचे कुराण वाचत असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
पाकिस्तानचे (Pakistan) खेळाडू आशिया चषकापासून (Asia Cup 2022) अधिक प्रसिध्द झाले आहेत. कारण आशिया चषकात सगळ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा खेळाडू मागच्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आला आहे. कारण तो सतत धावा करीत आहे.
سُـبْـحَـانَ ٱلله، محمد رضوان ? pic.twitter.com/lfJqIxkcsB
हे सुद्धा वाचा— Thakur (@hassam_sajjad) October 9, 2022
इंग्लंडची टीम ज्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी सुद्धा मोहम्मद रिझवान चांगल्या धावा केल्या आहेत, त्यामुळे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल असा चाहत्यांना विश्वास आहे. पाकिस्तानच्या टीमने अंतिम सामन्यात खराब कामगिरी केल्याने इंग्लंडने मालिका जिंकली.
पाकिस्तानची टीम सद्या न्यूझिलंड दौऱ्यावर आहे. तिथल्या मशिदीत जाऊन मोहम्मद रिझवान एक भाषण केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यात तो अल्लाहशिवाय कोणीही नाही असं म्हटला आहे.
विशेष म्हणजे व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून रिझवानचे कुराण वाचत असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.